Republic Day 2021 : प्रजासत्ताक दिन चिरायू होवो! नाशिकमध्ये पालकमंत्री छगन भुजबळांच्या हस्ते ध्वजवंदन 

नाशिक : प्रजासत्ताक दिनानिमित्त मंगळवारी (ता. २६) सकाळी येथील पोलिस कवायत मैदानावर पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते ध्वजवंदन पार पडले. 
विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस आयुक्त दीपक पांडे, विशेष पोलिस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर यांच्यासह विविध विभागांचे आधिकारी उपस्थित राहतील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्य संचलन पार पडले नाही. त्याऐवजी मोजक्या तुकड्यांचे संचलन पार पडले. सकाळी साडेआठपासून संचलनातील सहभागी प्लाटून सहभागी झाले होते.