RTO खात्यातील भ्रष्टाचारा संबंधी मंत्री Anil Parab यांची चौकशी का नाही? Gajendra Patil पुन्हा आक्रमक

<p>निलंबित आरटीओ निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी 15 मे 2021 रोजी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता आणि त्यामध्ये त्यांनी आरटीओ विभागातील बदल्या, अधिकाऱ्यांच्या कामकाजातील अनियमितता, आर्थिक गैरव्यवहार या संदर्भात तक्रार केली होती. त्याचबरोबर वरिष्ठ अधिकाऱ्यांसह परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही त्यांनी आरोप केले होते.</p> <p>निलंबित आरटीओ निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी दाखल केलेल्या तक्रारिनंतर पोलिसांनी कथित आरटीओ भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी सुरु केली होती. या चौकशीत पोलिसांना भ्रष्टाचार झाल्याचं आढळलं नाही. त्यामुळे वरिष्ट अधिकाऱ्यांसह परिवहन मंत्री अनिल परब यांनाही क्लिन चीट देण्यात आली होती. पण आता ईडीच्या कारवाई नंतर RTO खात्यातील भ्रष्टाचारा संबंधी मंत्री Anil Parab यांची पुन्हा चौकशी करण्यात यावी असा पुन्हा आक्रमक&nbsp; पवित्रआ Gajendra Patil यांनी घेतला आहे.&nbsp;</p>