Saamana : काँग्रेसच्या नावावरचा UPA चा सातबारा बदला, तरच एकजूट शक्य

<p>राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना यूपीएचं अध्यक्षपद द्यावं असा ठराव राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं मंजूर केल्यानंतर शिवसेनेनं यूपीएच्या जीर्णोद्धाराची गरज व्यक्त केलीय. शिवसेनेचं मुखपत्र सामनातून आज यावर भाष्य करण्यात आलंय. यूपीएचं सातबारा सध्या काँग्रेसच्या नावावर असून त्यात बदल केल्याशिवाय विरोधकांची भक्कम एकजूट होणं शक्य दिसत नाही, असं स्पष्ट मत सामनातून व्यक्त करण्यात आलंय. तसंच उत्तर प्रदेशात सेक्युलरवादाचे अजीर्ण झाल्यानं भाजपचा विजय झाला. बहुसंख्य हिंदू समाज देशाचा मुकुटमणी आहे याचं भान विरोधकांच्या नव्या आघाडीनं ठेवलं तरच यूपीएचा जीर्णोद्धार शक्य आहे, असं सांगत नव्या आघाडीला हिंदूत्वाचा विचार करण्याचा सल्लाही सामनातून शिवसेनेनं दिलाय.&nbsp;</p>