Sakal Impact : नाशिक पंचायत समितीत फेरीवाल्यांना ‘नो इंट्री’!

सिडको (नाशिक) : ‘हे पंचायत समिती कार्यालय आहे की साडी विक्री केंद्र’, या मथळ्याखाली ‘सकाळ’ने प्रसिद्ध केलेल्या बातमीची दखल घेत जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्वरित बाहेरील फेरीवाले तसेच कामाव्यतिरिक्त येणाऱ्यांना बंदी घालण्याचे फर्मान सोडले आहे. तसेच, येणाऱ्या प्रत्येकाचे रजिस्टरमध्ये नोंद केल्याचे चित्र बघायला मिळाले. 

फेरीवाल्यांना बंदी घालण्याची नोटीस

नाशिक पंचायत समितीत शिस्ती अभावी ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशा प्रकारचे चित्र नेहमी बघायला मिळते. फेरीवाल्यांचे प्रमाण वाढले होते. त्यातल्या त्यात ‘साडीवाले बाबा’ तर सर्वांना परिचित होते. बुधवारी (ता.२०) नेहमीप्रमाणे बाबा आले आणि त्यांनी महिलांना साडीविक्री केल्याचेची छायाचित्रासह बातमी ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाली. याची दखल घेत जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पिंगळे यांनी त्वरित अशाप्रकारे बाहेरून येणाऱ्या फेरीवाल्यांना बंदी घालण्याची नोटीस बजावली. 

हेही वाचा > ''माझ्या बायकोला आधी वाचवा हो'', रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नवऱ्याचा आक्रोश; दुर्देवी घटना

एवढेच नव्हे, तर दोन शिपाई या ठिकाणी तैनात केले. त्यांनी येणाऱ्या प्रत्येकाची कसून चौकशी करत रजिस्टरमध्ये नावनोंदणी, कामाचे स्वरूप, भ्रमणध्वनी क्रमांक व स्वाक्षरी करण्यास सांगितले. एवढेच नव्हे तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टेंपरेचरची तपासणी केल्याचे सकारात्मक चित्र बघायला मिळाले. तसेच, लेटलतिफ कर्मचाऱ्यांचाही समाचार घेण्यात आला. शुक्रवारी (ता.२२) पंचायत समिती सदस्यांची मासिक बैठक असल्याने या प्रकरणाची जोरदार खमंग चर्चा ऐकायला मिळाली.  

हेही वाचा > तो शेवटचा विवाहसोहळा! काही समजण्याच्या आतच विवाहितेची जीवनयात्रा संपली; वाडीचौल्हेर गावात शोककळा