Sakal Impact : महानिर्मितीची निर्मिती दोन हजार मेगावॉटने वाढली

एकलहरे (नाशिक) : राज्याची विजेची मागणी २२ हजार पाचशेवर जाऊन पोचली असली तरी महानिर्मितीची वाटचाल अजूनही मंदावलेली दिसून येत आहे. या अनुषंगाची बातमी ‘सकाळ’ला प्रसिद्ध झाल्यानंतर दोनच दिवसांत इम्पॅक्ट पहावयास मिळाला. 

एक संच झीरो शेड्युलमध्ये बंद 

शनिवारी (ता.१६) सकाळी वीजनिर्मिती साधारण दोन हजार मेगावॉटने वाढून ८,२०० मेगावॉटवर पोचलेली होती. गेल्या अकरा वर्षांत हा करिश्‍मा प्रथमच पाहावयास मिळाल्याचे कामगार, अभियंते सांगतात. 
महानिर्मितीची वाटचाल अनेक वर्षांपासून खडतर सुरू आहे. कधी खराब कोळसा, कधी अतिवृष्टी, तर दुष्काळ अशा परिस्थितीतही महानिर्मिती खंबीर पाय रोवून उभी आहे. महानिर्मितीचे संचालक संचलन बदलले व राजेंद्र बुरडे यांच्याकडे कार्यभार आल्यावर बातमीची दखल घेत मागणी चोवीस हजारांवर पोचली होती. त्या वेळी महानिर्मितीची निर्मिती ८,१७४ वर सुरू होती. नाशिक औष्णिक वीज केंद्राची क्षमता ६१० मेगावॉट असून, एक संच झीरो शेड्युलमध्ये बंद आहे. 

खापरखेडा क्षमता १३४० मेगावॉट 

एक संचाचा कोळसा खासगी वीज केंद्राला वळविण्यात आला आहे. सध्या फक्त एक संचामधून १२१ मेगावॉट वीजनिर्मिती सुरू आहे. कोराडीची क्षमता २,४०० मेगावॉट आहे. आज सकाळी १,६७९ मेगावॉट सुरू होती. खापरखेडा क्षमता १३४० मेगावॉट आहे. तेथून ६४१ मेगावॉट निर्मिती सुरू होती. पारस ५०० मेगावॉट क्षमता असून, ४३४ वीजनिर्मिती सुरू होती. परळी १,१७६ क्षमताचे पाच संच असताना तीन संचांमधून ५४८ मेगावॉट वीजनिर्मिती सुरू होती. तर चंद्रपूरची क्षमता २,९१० मेगावॉट असून, १,९०० मेगावॉट, भुसावळ तीनपैकी एक संच बंद असून, दोन संचांमधून १,२१० मेगावॉटपैकी ९३२ मेगावॉट अशी बऱ्यापैकी जोमात सुरू होती. 

हेही वाचा > ऐनसंक्रांतीच्या सणाला घरावर ओढावली 'संक्रांत'; लेकाला उराशी धरुन मातेचा जीवघेणा आक्रोश

किमान दहा ते बारा हजार मेगावॉट निर्मितीची क्षमता

महानिर्मितीला प्रोत्साहन मिळाल्यास १३,६०२ मेगावॉटपैकी किमान दहा ते बारा हजार मेगावॉट निर्मिती करू शकते, हे सिद्ध झाले आहे. महानिर्मितीला चांगला पाठिंबा व मार्गदर्शन मिळाल्यास प्रकल्पांना जीवन संजीवनी मिळेल, असे एका अभियंत्याने ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. 

हेही वाचा > ढोंगीबाबाचा कारनामा! आधी खड्याचा केला रुद्राक्ष अन् नंतर केले असे काही; रवानगी थेट पोलिस ठाण्यातच

महानिर्मितीची उच्चांकी वीजनिर्मिती झाली आहे. तिचे श्रेय कंपनीच्या अधिकारी, अभियंता, कामगार व कंत्राटी कामगार यांना जाते. - राजेंद्र बुरडे, संचालक संचलन महानिर्मिती