Sakal Impact : ‘महानिर्मिती’च्या कर्मचाऱ्यांचे पगार अखेर खात्यावर जमा 

एकलहरे (नाशिक) : राज्यात वीजनिर्मितीत अग्रेसर असलेल्या महानिर्मिती कंपनीच्या ४०-५० वर्षांच्या इतिहासात पगार कधी विलंबाने झाले नाही, ते या वर्षात दोन-तीन वेळेस विलंबाने झाले. त्यासंदर्भात ‘सकाळ’ने सोमवारी (ता. ५) वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर तत्काळ सायंकाळी कामगारांच्या खात्यात पगार जमा झाला. 

 ‘महानिर्मिती’च्या कर्मचाऱ्यांचे पगार अखेर खात्यावर जमा
महानिर्मिती आपल्या क्षमतेपेक्षा फक्त ७० टक्के मनुष्यबळावर काम करत आहे. त्यातही महानिर्मिती प्रत्येक वीजनिर्मिती केंद्रात कोरोनाबाधितांची संख्याही खूप आहे. त्यामुळे उरलेल्या कर्मचाऱ्यांवर ताण येत आहे. तरीही वीजनिर्मितीचा उच्चांक कर्मचारी करत आहेत, ही खरोखरच महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद बाब आहे. 

हेही वाचा - क्रूर नियती! अखेरच्या क्षणी बापाला खांदा देणंही नाही नशिबी; कोरोनाबाधित मुलाचे व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे अंत्यदर्शन

अतोनात अडचणींना सामोरे
यात आज संपूर्ण भारतात त्यातल्या त्यात महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने झोप उडवलेली असताना महानिर्मितीने वीजनिर्मितीचा आतापर्यंतचा उच्चांक गाठून महाराष्ट्राची सेवा चालविली आहे. मात्र आज ही सेवा करताना अधिकारी व कर्मचारी यांना अभिमान वाटत असला तरी वेळेवर पगार मिळत नसल्याने त्यांना अतोनात अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध केले. या वृत्ताची महानिर्मितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या खात्यावर सायंकाळी वेतन जमा केले.