Sakal Impact : मुस्लीम मृतदेहांची शववाहिकेअभावी हेळसांड थांबली; सकाळच्या दणक्यानंतर बॅटऱ्या उपलब्ध  

जुने नाशिक :  शववाहिकेच्या १० ते १२ दिवसापूर्वी बॅटऱ्या चोरी गेल्याने तेव्हापासून शववाहिका उपलब्ध होत नसल्याने मुस्लिम समाजातील मृतदेह कब्रस्तानपर्यंत नेतांना अडचण यायची. गुरुवार (ता.१०) याबाबतचे वृत्त सकाळमध्ये प्रसिद्ध होताच, महापालिकेने एका शववाहिकेस त्वरीत बॅटरी उपलब्ध करुन दिली. अखेर एक तरी शववाहिका सुरु झाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. 

मृतदेहांची हेळसांड थांबली

मुस्लिम समाजातील मृतदेहास दफन विधीसाठी कब्रस्तानपर्यंत घेवून जाण्यासाठी दोन शववाहिका (जनाजा रथ) महापालिकेकडून उपलब्ध करुन जातात. काही दिवसापूर्वी दोघांच्या बॅटरी चोरी झाल्या होत्या. बॅटरी व्यतिरीक्त शववाहिका उपयोगात येत नसल्याने डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयाच्या आवारात धूळखात पडून होत्या. तर दुसरीकडे मुस्लिम समाजातील मृतदेहास कब्रस्तानपर्यंत घेवून जाण्यासाठी रथ उपलब्ध होत नसल्याने अडचण निर्माण झाली होती. जुने नाशिक बाहेरील मृतदेहांची मोठी गैरसोय सुरु होती. खाजगी वाहनांचा वापर करावा लागत होता. याबाबतचे वृत्त गुरुवारी (ता.१०) सकाळ च्या अंकात प्रसिद्ध करण्यात आले. महापालिकेकडून याची दखल करुन घेत त्वरीत एका रथासाठी बॅटरी उपलब्ध करुन देण्यात आली. त्यामुळे एक तरी रथ सेवेत आल्याने मुस्लिम बांधवानी समाधान व्यक्त केले. शुक्रवार (ता.११) रोजी फुले मार्केट येथील सामान्य कुटूंबातील वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याने दफन विधीसाठी शववाहिका उपलब्ध होउ शकली. 
नव्हती. 

हेही वाचा>> जेव्हा अजगर गिळायला लागतो संपूर्ण बोकडाला! तब्बल पाच-सहा तास प्रयत्न; पाहा VIDEO

शहराचा विचार करता एका रथावर अवलंबून राहणे योग्य नाही. विविध भागातून रथाची मागणी होत असल्याने दुसऱ्या रथासही बॅटरी उपलब्ध करुन देण्यात यावी. त्यामुळे एका रथावर अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही. तसेच दोन्ही रथ कार्यरत राहिले. देखभाल दुरुस्तीची आवश्‍यकता भासणार नाही.  

 हेही वाचा>> शिवला डॉक्टर नाही तर इंजिनिअर करीनच!" फुटपाथावर जगत असलेल्या जिद्दी दाम्पत्याचं स्वप्न