Sanjay Raut : हमला करो गोली मारो फिर भी हम शिवसेना मे रहेंगे

Sanjay Raut

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क

आमच्यासोबत बाळासाहेब ठाकरेंचा आशिर्वाद आहे. जी मूळ शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची आहे, त्यामागे संपूर्ण शिवसेना उभी आहे. बाकी सगळा औट घटकेचा खेळ आहे. आज आले उद्या जातील अशी प्रतिक्रीया शिवसेना खासदार (ठाकरे गट) संजय राऊत (Sanjay Raut)  यांनी दिली.

संजय राऊत (Sanjay Raut)  हे नाशिक दौ-यावर असून आज ठाणे पोलिसांचे पथक त्यांचा जबाब नोंदवून घेण्यासाठी नाशिकमध्ये आले होते. जबाब नोंदणी झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव व धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला बहाल केल्यानंतर संजय राऊत यांनी काही विवादित विधाने केली होती. याबाबत कार्यकारणीच्या बैठकीत निषेधाचा ठराव संमत करण्यात आला. त्याविषयी विचारले असता संजय राऊत म्हणाले, मी माझ्या पक्षाशी एकनिष्ठ आहे. माझा ठराव त्यांनी वारंवार निषेधाचा केला पाहीजे. मी त्यांचा कडवट विरोधक आहे. तो माझ्यासाठी सन्मान असल्याचे राऊतांनी सांगितले.

नाशिकमध्ये संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल झालाय त्यावर विचारले असता राऊत म्हणाले, मी मुख्यमंत्र्यांविषयी अपशब्द वापरला नाही. याउलट अमित शहा महाराष्ट्रात आले व त्यांनी आमच्या नेत्याविषयी अपशब्द वापरले. मी त्यांना त्याच शब्दात उत्तर दिले. मग तसे असेल तर गुन्हा दोघांवर दाखल व्हायला हवा असे राऊत म्हणाले. दरम्यान गुन्हे दाखल होऊ द्या, हमला करो, गोली मारो फिर भी हम शिवसेना मे रहेंगे. हम डरने वाले लोग नही है, हम डरके बहुत आगे निकल चुके है असे संजय राऊत म्हणाले.

दरम्यान संजय राऊतांनी गृहमंत्र्यांना लिहलेल्या पत्रानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी संजय राऊतांना पत्र लिहित डिवचले होते. त्याविषयी  विचारले असता कोण संदीप देशपांडे ? कुठला पक्ष, असा पक्ष अस्तित्वात आहे का? असा टोला त्यांनी लगावला.

हेही वाचा : 

The post Sanjay Raut : हमला करो गोली मारो फिर भी हम शिवसेना मे रहेंगे appeared first on पुढारी.