Sanjay Raut on Nashik Tour : महापालिका निव़णुकांच्या तयारीसाठी शिवसेना खासदार संजय राऊत नाशकात

<p>नाशिकच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचा विसर पडायला का? असा सवाल उपस्थित होत आहे, शिवसेना नेते&nbsp;संजय&nbsp;राऊत&nbsp;यांच्या हस्ते बिटको रुग्णालयाचे हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे नामकरण करण्यात आले, मात्र या रुग्णालयाच्या समोरच शिवसेनने मोठे होर्डिंग्ज लावले आहेत त्यात बाळासाहेब ठाकरे,&nbsp;संजय&nbsp;राऊत&nbsp;यांच्यांसाह नाशिकच्या पदाधिकाऱ्यांची छबी आहे स्वतः नाशिकरोडचे सभापती प्रशांत दिवे यांची ही मोठी छबी आहे मात्र मुख्यमंत्रीची छबीच दिसत नाही, विशेष म्हणजे रुग्णालयाचे भूमिपूजन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालाय. एबीपी माझाने&nbsp; सभापतीकडे विचारणा केली असता सर्वपक्षीय कार्यक्रम असल्याचं सांगितले, मात्र कार्यक्रमाला महापौर आयुक्त यांची ही अनुपस्थिती राहिली याबाबत&nbsp; वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.</p>