सप्तशृंगगड (जि.नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
आदिमाया, श्री भगवती सप्तशृंगी देवीच्या मूर्ती संवर्धन व देखभाल आणि वज्रलेपनास बुधवारी (दि. 20) विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्धन पी. देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ झाला. विश्वस्त भूषणराज तळेकर यांच्या हस्ते व वेदमूर्ती भालचंद्रशास्त्री शौचे, शांतारामशास्त्री भानोसे, महंत सुधीरदास पुजारी, पुजारी पंडित गायधनी, राहुल बेळे, प्रणव पुजारी, प्रमोद दीक्षित, पुरोहित संघ अध्यक्ष धनंजय दीक्षित, समिती प्रतिनिधी श्रीकांत दीक्षित, शेखर देशमुख यांनी पौरोहित्य आणि धार्मिक विधी पार पाडले.
श्री भगवतीची विशेष पंचामृत महापूजा करून अनुष्ठानास प्रारंभ करून श्री दुर्गा सप्तशती पाठ वाचन, कुंजिका स्तोत्र, देवी अथर्वषीर्ष व नवार्नव मंत्र जप करण्यात आले. त्याचप्रमाणे विनायक शांती होम, अद्भूत शांती, अघोर होम, तेजोत्रारण (कलाकर्षण) इत्यादी विधींची यावेळी पूर्तता करण्यात आली. 10 हजार दुर्गासप्तशती पाठाचे वाचन करण्याचे नियोजन निर्धारित केलेले आहे. याप्रसंगी महामंडलेश्वर सोमेश्वरानंद सरस्वती, सिद्धेश्वराय सरस्वती, नाथनंद सरस्वती, रामानंद सरस्वती, योगी अवंतिकानाथ, बन्सी महाराज (गुजरात), महंत भारती महाराज, गोरक्षनाथ महाराज यांनी शुभाशीर्वाद दिले.
आमदार नितीन पवार आणि आमदार दिलीप बनकर यांनीदेखील श्री भगवतीचे दर्शन घेतले. विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्धन पी. देसाई, अॅड. ललित निकम, अॅड. दीपक पाटोदकर, मनज्योत पाटील, डॉ. प्रशांत देवरे, भूषणराज तळेकर, सुदर्शन दहातोंडे, भगवान नेरकर, प्रकाश जोशी, भिकन वाबळे आदी उपस्थित होते.
हेही वाचा :
- तळमावले चौकातील खड्डयामुळे अपघात
- करंजेत 15 घरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या
- पुणे : आरटीओचे ‘वन डे ऑपरेशन’; दिवसभरात 358 शालेय वाहनांची झाडाझडती
The post Sapthasringi Devi : श्री सप्तशृंगी देवी मूर्ती वज्रलेपनास प्रारंभ appeared first on पुढारी.