
सप्तशृंगगड प्रतिनिधी : पुढारी वृत्तसेवा
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री. क्षेत्र सप्तशृंगगड येथील सप्तशृंगी देवी मंदिर नविन वर्षानिमित्त भाविकांना दर्शन घेता यावे म्हणून आज 24 तास खुले राहणार आहे.
दरवर्षी लाखो भाविक नवीन वर्षाची सुरवात ही सप्तशृंगी देवीच्या दर्शनाने करत असतात. याहीवर्षी भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता मंदिर आज (दि. 31) दिवसभर खुले ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे.
यावर्षी सप्तशृंगीगडावर नववर्षाच्या स्वागतासाठी नेहमीपेक्षा जास्त गर्दी होण्याची शक्यता आहे. सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी विविध राज्यातून मोठ्या संख्येने भाविक -भक्तांची गर्दी वाढते आहे. त्यामुळे मंदिर देवस्थानच्या वतीने येणाऱ्या भाविकांची गर्दी विभागली जावी आणि सर्वांना सहजतेने भगवती दर्शन घेता यावे यासाठी मंदिर 24 तास खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती विश्वस्त संस्थेच्या मार्फत देण्यात आली आहे.
- राजगुरूनगर-भीमाशंकर महामार्गाचे काम तातडीने सुरू करा; दिलीप मेदगे यांची गडकरींकडे मागणी
- सोमेश्वर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी प्रणिता खोमणे; प्रथमच महिलेला मिळाली संधी
- पिंपरी : वैयक्तिक घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना 25 कोटी 46 लाखांचे अनुदान वितरित
The post Saptshringigad Nashik : सप्तशृंगी देवी मंदिर दर्शनासाठी राहणार आज 24 तास खुले appeared first on पुढारी.