Sharad Pawar : एकनाथ शिंदेच्या आधीच शरद पवार नाशकात

नाशिक :  आज सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिकमध्ये येणार आहेत. मुख्यमंत्र्याचा दोन दिवसांचा नियोजित जिल्हा दौरा आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार शऱद पवार हे देखील नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. शरद पवार हे 29 व 30 जुलै रोजी नाशिक व धुळे जिल्ह्याच्या दौ-यावर आहेत.

आज दुपारी ओझर विमानतळावर शरद पवार यांचे आगमन झाले. जिल्ह्याचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पुष्पगुच्छ देत त्यांचे स्वागत केले. यावेळी माजी आमदार हेमंत टकले, आमदार दिलीप बनकर, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड आदी यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा :

The post Sharad Pawar : एकनाथ शिंदेच्या आधीच शरद पवार नाशकात appeared first on पुढारी.