Shirdi : साईसंस्थानचे माजी CEO कान्हूराज बगाटे अडचणीत, Bombay High Court ची बगाटेंना नोटीस

<p>शिर्डीतील साईबाबा संस्थानचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे अडचणीत आले आहेत. साई संस्थान समिती आणि न्यायालयाची परवानगी न घेता 25 कोटींची बिलं अदा केल्याचा आरोप याचिकाकर्ते संजय काळेंनी केलाय. परस्पर निधी खर्च केल्यानं मुंबई उच्च न्यायालयानं बगाटेंना नोटीस पाठवली आहे. फक्त दैनंदिन खर्च करण्याची परवानगी असतानाही कोट्यवधींची बिलं अदा केल्याचा आरोपही काळेंनी बगाटेंवर केला गेला आहे.</p>