Shirdi Airport : कोरोनामुळं खंडीत असलेली शिर्डीतील विमानसेवा आजपासून पूर्ववत ABP Majha

<p>आता देशभरातल्या साईभक्तांसाठी एक खूशखबर आहे. कोरोनामुळे दीड वर्षांहून अधिक काळ बंद असलेले शिर्डीतील विमानतळ आजपासून सुरु होणार आहे. आज सकाळी 11.30 वाजता दिल्ली येथून पहिलं विमान शिर्डीत दाखल होणार आहे. तर दुपारी 12.30 वाजता हेच विमान दिल्लीकडे रवाना होणार आहे.</p>