Shirdi Airport : शिर्डीतील विमानसेवा आजपासून पूर्ववत, ग्रामस्थांकडून प्रवाशांचं जंगी स्वागत

<p>आता देशभरातल्या साईभक्तांसाठी एक खूशखबर आहे. कोरोनामुळे दीड वर्षांहून अधिक काळ बंद असलेले शिर्डीतील विमानतळ आजपासून सुरु होणार आहे. आज सकाळी 11.30 वाजता दिल्ली येथून पहिलं विमान शिर्डीत दाखल झालं आहे. तर दुपारी 12.30 वाजता हेच विमान दिल्लीला रवाना झालं आहे.</p>