Shirdi International Airport : साईभक्तांसाठी खुशखबर; कोरोनामुळं खंडीत झालेली शिर्डीतील विमानसेवा आजपासून सुरु

Shirdi International Airport : आता देशभरातल्या साईभक्तांसाठी एक खूशखबर आहे. कोरोनामुळे दीड वर्षांहून अधिक काळ बंद असलेले शिर्डीतील विमानतळ आजपासून सुरु होणार आहे. आज सकाळी 11.30 वाजता दिल्ली येथून पहिलं विमान शिर्डीत दाखल होणार आहे. तर दुपारी 12.30 वाजता हेच विमान दिल्लीकडे रवाना होणार आहे.

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर लॉकडाऊन लागू करण्यात आलं होतं. लॉकडाऊनचा परिणाम अनेक गोष्टींवर झाला आहे. अशातच कोरोना प्रादुर्भावात शिर्डी विमानतळावरील सेवा बंद करण्यात आली होती. पण आता ही सेवा सुरु करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे.

कोरोनामुळं गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेली शिर्डी विमानतळावरची सेवा आजपासून पुन्हा सुरु होत आहे. आज दिल्ली, हैदराबाद आणि चेन्नईमधून साईभक्तांना घेऊन विमानं शिर्डी विमानतळावर उतरणार आहेत. सकाळी साडेअकरा वाजता दिल्लीहून, दुपारी अडीच वाजता हैदराबादहून तर दुपारी चार वाजता चेन्नईवरुन आलेल्या विमानाचं शिर्डी विमानतळावर लँडिंग होणार आहे. कोरोनामुळं खंडीत झालेली विमानसेवा पूर्ववत होत असल्यानं साईभक्तांनी आनंद व्यक्त केला आहे.

शिर्डी विमानतळावर लँडिंग होणाऱ्या विमानांचं वेळापत्रक :

10 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.30 वाजता दिल्ली येथून शिर्डीत पहिलं विमान दाखल होणार

दुपारी 12.30 वाजता हेच विमान दिल्लीकडे रवाना होणार

दुपारी 2.30 वाजता हैदराबाद येथून शिर्डीत विमान येणार असून दुपारी 3 वाजता पुन्हा हैदराबादला जाणार

दुपारी 4 वाजता चैन्नई येथून शिर्डीत विमान येणार असून दुपारी 4.30 वाजता पुन्हा चैन्नईकडे रवाना होणार

राज्य सरकारनं घटस्थापनेच्या दिवसापासून धार्मिक स्थळं सुरु करण्यास परवानगी दिली होती. त्यामुळे सध्या मंदिरांची दारं उघडली आहेत. मंदिरं सुरु झाल्यानं भाविकांना आता शिर्डीतील साईबाबांचं दर्शनसुद्धा घेता येणार आहे. तर मंदिरं सुरु झाल्यानंतर विमानसेवा सुरु होणं गरजेचं होतं. त्यामुळे आता विमानतळ विकास प्राधिकरणानं हे विमानतळ नागरिकांसाठी खुलं करण्याचा निर्णय घेतला आहे.

शिर्डी विमानतळावर सुरुवातीला स्पाईसजेट, इंडिगो एअरलाइन्सची सेवा दिल्ली हैदराबाद आणि चेन्नई ठिकाणसाठी असणार आहे. त्यानुसार विमानाचं वेळापत्रक सुद्धा जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे नागरिकांना प्रवास करण्यापूर्वी हे वेळापत्रक पाहावं लागणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Narayan Rane : मुख्यमंत्र्यांना उद्देशून नारायण राणे म्हणाले, 'उद्धवजी, बाळासाहेबांच्या प्रेरणेनं मी इथं विकासकामं केली'

Chipi Airport : विमानतळाचं लोकार्पण, मुख्यमंत्री ठाकरे, मंत्री नारायण राणे कित्येक वर्षांनी आमनेसामने, मंचावर नेमकं काय घडलं?