Shiv Sena vs BJP : नाशिकमध्ये भाजप कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी शिवसैनिकांना अटक ABP Majha

<p>नाशिकमध्ये भाजप कार्यालयाची तोडफोड केल्याचा आरोप असलेले शिवसैनिक आज पोलीस ठाण्यात हजर झाले. दीपक दातीर, बाळा दराडे आणि इतर दोघांना नाशिक पोलिसांनी अटक केलीय. नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केल्यानंतर शिवसैनिकांनी आंदोलन केलं होतं. तेव्हा नाशिकमध्ये भाजप कार्यालयावर शिवसैनिकांनी दगडफेक केली होती. त्यानंतर आरोप असलेले शिवसैनिक फरार होते. काल ते खासदार संजय राऊत यांच्याबरोबर मुंबईत दिसले. आज राऊत नाशिकमध्ये येताच आरोपी शिवसैनिकही पोलिसांसमोर हजर झाले.</p>