झोपतांना शरिराची स्थिती कशी असावी ?

झोपेचा उद्देश शरिराला विश्रांती मिळावी, हा असतो. या दृष्टीने ‘ज्या स्थितीत शरिराला सर्वांत जास्त आराम मिळेल, ती झोपेची स्थिती चांगली’, हा सामान्य नियम होय. प्रत्येकाची प्रकृती आणि तत्कालीन स्थिती यांनुसार आरामदायी स्थिती वेगवेगळी असू शकते. आपण कोणत्या स्थितीत झोपावे, हे झोप लागेपर्यंतच आपल्या हातात असते. झोप लागल्यावरची शरिराची स्थिती आपल्या नियंत्रणात नसते. ज्यांना घोरण्याची सवय आहे, त्यांचे घोरणे उताणे झोपल्याने वाढते. झोपेमध्ये जेव्हा घशाची अंतस्त्वचा (आतील त्वचा) शिथिल होऊन श्‍वसनमार्गात अडथळा निर्माण होतो, तेव्हा घोरणे चालू होते. उताणे झोपल्याने श्‍वसनमार्गात अडथळा निर्माण होण्याचे प्रमाण वाढते. कुशीवर झोपल्याने शिथिल झालेली अंतस्त्वचा श्‍वसनमार्गातून बाजूला झाल्याने घोरणे थांबते. यामुळे कुशीवर वळल्यावर घोरणे न्यून झाल्याचा अनुभव अनेकांना येतो.

अधिक माहितीसाठी भेट द्या : https://www.sanatan.org/mr/a/56009.htmlhttps://www.sanatan.org/mr/a/56009.html

Leave a Reply