Special Report | नाशकात लसीकरणाचा सावळागोंधळ, लशीविना केंद्र बंद!

<p>&nbsp;कोरोनापासून बचावासाठी लस घ्या असं एकीकडे सरकार आवाहन करत असतांनाच दुसरीकडे नाशिकमध्ये आज सलग नवव्या दिवशी शासकीय लसीकरण केंद्रांवर कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस न मिळाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून शहरात लसीकरण सुरळीत नसून प्रशासन देखिल हतबल झाल्याचं बघायला मिळतय. विशेष म्हणजे खासगी हॉस्पिटलमध्ये मात्र हेच लसीकरण नियमितपणे सुरु असल्याने सरकारी कामात सुधारणा कधी होणार असाच प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.&nbsp;</p>