ST Strike : ST सुरू करण्याचा महामंडळाचा प्रयत्न, शिवनेरी बसवर खासगी चालकवापरून बस सेवा सुरू
<p>एसटीचे कर्मचारी संप मागे घेण्यास तयार नाहीत, त्यामुळे एसटी महामंडळानं शिवनेरी बसद्वारे पुणे आणि नाशिकमधून सेवा सुरू केलीय. शिवनेरी बसवर खासगी चालकांची ड्युटी लावून बस नाशिकवरून पुणे, मुंबईसाठी रवाना करण्यात आल्या. संपात फूट पाडण्यासाठी शिवनेरी सुरू केल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय.</p>