Success Story : कोरोना संकटातही घेतले एकरी दोन लाखांचे उत्पन्न; केळी उत्पादकाची कमाल

नाशिक / शहापूर : देशभरात कोरोनाचे सावट असल्याने शेतमालासह सर्वच क्षेत्रांत मंदीचे वातावरण आहे. मात्र, अशाही स्थितीत येथील विजय पाटील यांनी केळीतून एकरी दोन लाख रुपये उत्पन्न घेतले. नेमके कसे ते एकदा वाचा..

कोरोना संकटातही घेतले एकरी दोन लाखांचे उत्पन्न 

पाटील यांनी दोन एकर क्षेत्रांवर तीन हजार पिलबाग खोडे ठेवली होती. पिलबागाची वाढ चांगली झाल्याने घडाची फण्या छाटणी करण्यासाठी मजुरास स्टूलवर उभे राहून फण्या तोडाव्या लागल्या होत्या. तीन एकर क्षेत्रावर नोव्हेंबर २०१९ मध्ये पाच हजार शंभर खोडांची लागवड केली होती. लागवडीसाठी जैन ब्रदर्सचे ‘जी ९’ हे टिशूकल्चर रोपे लावली होती. पिकासाठी रासायनिक खताऐवजी शेणखताचा वापर केल्याने चांगला उपयोग झाल्याचे पाटील यांनी सांगितले. 

पाच एकरांवर दहा लाख रुपयांहून अधिक उत्पन्न
केळीचे घड वजनदार व सुदृढ, चांगल्या प्रतीचे व्हावे, यासाठी घडाच्या खालच्या फण्या तोडल्यामुळे घडाची पोसणी चांगली होऊन माल चांगला व लवकर तयार झाला. नोव्हेंबरमध्ये लागवड केल्यामुळे नवरात्रीपासून माल सुरू झाला व सरासरी एक हजार दोनशे रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. दोन एकरवर पिलबाग व तीन एकरवर नवीन रोपे लागवड, अशा पाच एकरांवर दहा लाख रुपयांहून अधिक उत्पन्न मिळाले आहे. या पाच एकरावर शेवटपर्यंत अडीच लाख रुपये खर्च झाल्याचे त्यांनी सांगितले. 

हेही वाचा - दुर्दैवी! एकीकडे बहिणीच्या वाढदिवसाचा आनंद; दुसरीकडे क्षणार्धात भावाची निघाली अंत्ययात्रा

‘ॲग्रोवन’मुळे प्रेरणा 
विजय पाटील हे ‘सकाळ’ समूहाच्या ॲग्रोवन या कृषी दैनिकाचे सुरवातीपासून वाचक आहेत. त्यातील कृषीविषयक लेख व प्रगतिशील शेतकऱ्यांच्या मुलाखती वाचून प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. पाटील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य असून, त्यांच्या पत्नी शहापूरच्या माजी सरपंच आहेत. दोन्ही मुलेही सुशिक्षित असून, तेही शेती पाहतात.  

हेही वाचा - धक्कादायक! तपोवन परिसरात आढळला युवतीचा विवस्त्र मृतदेह; परिसरात खळबळ