Success Story : महात्मा गांधींच्या चरख्याने मिळवून दिला रोजगार; संकटाच्या काळात तरुणांनीही आत्मनिर्भर होण्याचा सल्ला

जुनी शेमळी (जि. नाशिक) : कोरोना महामारीचा फटका सर्वच उद्योगाना बसला आहे. जगभरातील लहान-मोठे उद्योग धोक्यात आलेत. दरम्यान या सगळ्या संकटाच्या काळात देखील बागलाण तालुक्यातील किरातवाडी येथे महात्मा गाधींच्या चरख्याच्या सहाय्याने रोजगार मिळवण्यासाठी व्यवसाय सुरु केला आहे.

येथील आदिवासी वस्ती ही जुनी शेमळी ग्रामपंचायतीत येत असून, या वस्तीतील तरुण किरण व्यापार याने नववीपर्यंत शिक्षण पूर्ण करून भविष्यात रोजगार मिळावा, या हेतूने हे काम शिकले आहे.

विविध उपयोगांसाठी रंगीबेरंगी घोंगडी

त्यांनी हिवाळ्यात खंडेराव महाराज यात्रोत्सवासाठी तळी भरण्यासाठी तसेच तर पावसाळ्यात कोकणी बांधवांना भात लागवडीसाठी व कायमस्वरूपी झोपण्यासाठी रंगीबेरंगी घोंगड्यांची गरज भासते. ही गरज शोधली व व्यावसायाची संधी लक्षात घेत घोंगडी बनवण्यासाठी लागणारे सागवाण, तूर आदी लाकडांपासून माकडी, वडनारे, सागवाणपट्टी, टोकर, लाकडी पट्ट्या तयार करून स्टिल नळी, दोर आदि साहित्य जमा करून महात्मा गांधीच्या काळातील लाकडी चरखा बनवला आहे.

हेही वाचा >> मनाला चटका लावणारी बातमी! माऊलीच्या नशिबी दोनदा दफनविधी अंत्यसंस्काराचा योग; जुळली मुलांशी झालेली ताटातूट

अशी बनते उबदार घोंगडी

घोंगडी बनवण्यासाठी मेंढीची लोकर पन्नास रुपये किलो व चिंच ३० रुपये किलो विकत घेऊन चिंचेचे पाणी गरम पाण्यात उकळून कोरडी लोकर या गरम पाण्यात टाकून घट्ट केली जाते. लोकर उन्हात वाळवून चिंचेच्या पाणीने कांजी करून हा धागा चरख्याने विणला जातो. रंगीबेरंगी धागा या कामासाठी लागतो. तीन तासांनंतर हा धागा सुकल्यावर एक दिवसात साडेतीन फूट रुंद व लांबी सात फूट अशा दोन घोंगड्या तयार केल्या जातात. एका घोंगडीसाठी ५०० रुपये खर्च येतो व बाजारात एक हजार ते बाराशे रुपयाने ती विकली जाते. मात्र दिवसभर हाताने काम असल्याने मेहनतीने हे काम करावे लागत आहे. 

हेही वाचा >> बळीराजाच्या नशिबी दुर्दैवच; जेव्हा स्वत:च्याच डोळ्यादेखत संसाराची राखरांगोळी होते तेव्हा..

 

 

बारमाहीया घोंगडीला मागणी असल्याने लोकराच्या काळ्या-सफेद रंगीत धाग्याने ही घोंगडी कसरतीने बनविली जात असल्याने व्यापारीही ही घोंगडी जागेवर गावात येऊन विकत घेऊन जातात व ऑर्डरप्रमाणे ही घोंगडी दिली जाते.  -किरण व्यापार, किरातवाडी