शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! शेतीसाठी दिवसा मिळणार १२ तास वीज

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– शासनाने मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना-२.० अंतर्गत आठ हजार मेगावॉट वीजनिर्मिती क्षमता गाठण्यासाठी निविदाप्रक्रिया निश्चित केली आहे. संबंधित कंपन्यांनी १८ प्रकल्प उभारणी करायची आहे. हे प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांना दिवसाकाठी सिंचनासाठी १२ तास वीज उपलब्ध होणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा सिंचनाकरिता वीज उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग …

The post शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! शेतीसाठी दिवसा मिळणार १२ तास वीज appeared first on पुढारी.

Continue Reading शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! शेतीसाठी दिवसा मिळणार १२ तास वीज

कुणी रोप देता का रोप? शेतकरी हिंडतोय रानोमाळी

पिंपळनेर: (जि.धुळे) पुढारी वृत्तसेवा ; उन्हाळी कांदा लागवडीचा हंगाम संपला नसला तरी बहुतांश शेतकऱ्यांकडील रोप मात्र संपले आहे. खुंटलेल्या रोपामुळे कांदा लागवड अपूर्ण राहिलेले शेतकरी ‘कुणाकडे रोप उरले आहे काय’ याबाबत रानोमाळ हिंडून चौकशी करत आहेत. लागवडीवेळी रोप कमी पडू नये यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने जास्तीचे कांदा बियाणे पेरले होते. परंतु बदललेले वातावरण, अवकाळी पाऊस, अनेक …

The post कुणी रोप देता का रोप? शेतकरी हिंडतोय रानोमाळी appeared first on पुढारी.

Continue Reading कुणी रोप देता का रोप? शेतकरी हिंडतोय रानोमाळी

अन्यथा शेतकऱ्यांसह कार्यालयात ठिय्या मांडू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- खरीप हंगामातील पिकांसाठी २५ टक्के भरपाईची रक्कम आॅगस्ट अखेरपर्यंत शेतकऱ्यांना देणे अपेक्षित असताना अद्यापही त्याचे पूर्ण वाटप झालेले नाही. कापूस पिकाच्या समावेशाचे आदेश असतानाही विमा कंपन्यांकडून टाळाटाळ केली जात असल्याबद्दल पालकमंत्री दादा भुसे यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. आठ दिवसांत शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करावे. अन्यथा शेतकऱ्यांना घेऊन कंपनीच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन …

The post अन्यथा शेतकऱ्यांसह कार्यालयात ठिय्या मांडू appeared first on पुढारी.

Continue Reading अन्यथा शेतकऱ्यांसह कार्यालयात ठिय्या मांडू

नाशिक : द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना फसविणाऱ्या तिघांना कोठडी

पिंपळगाव बसवंत (जि.नाशिक) : पुढारी वृत्तसेवा द्राक्ष व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी होऊन सुकेणा, उगाव परिसरासह निफाड तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या तिघांना पाेलिस कोठडी देण्यात आली. बीके फ्रूट क्फत संशयित मनोज साहू (रा. चंद्रभागानगर, पिंपळगाव बसवंत), लक्ष्मण शिंदे (रा. वनसगाव) व जितू पाटील (रा. पिंपळगाव बसवंत) यांनी शेतकऱ्यांच्या द्राक्षबागेत जाऊन द्राक्षमालाचा ४५ रुपये क्विंटल दराने व्यवहार ठरवला …

The post नाशिक : द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना फसविणाऱ्या तिघांना कोठडी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना फसविणाऱ्या तिघांना कोठडी

शेतकऱ्यांनी उत्पादनवाढीसाठी महाबीज निर्मिती करावी: बाबासाहेब कोटकर

धुळे, पुढारी वृत्तसेवा : शेतकऱ्यांनी पिकांची गुणवत्ता व उत्पादनवाढीसाठी महाबीज निर्मित द्रवरुप जैविक खते व जैविक बुरशीनाशकांचा वापर करण्याचे आवाहन महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक बाबासाहेब कोटकर यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळा मार्फत गुणवत्तापूर्वक द्रवरूप जैविक खते व जैविक बुरशीनाशक यांचे उत्पादन करत आहे. या जैविक द्रवरूप खते व बुरशीनाशक यांचा शेत जमिनीत उपयोग केल्यामुळे …

The post शेतकऱ्यांनी उत्पादनवाढीसाठी महाबीज निर्मिती करावी: बाबासाहेब कोटकर appeared first on पुढारी.

Continue Reading शेतकऱ्यांनी उत्पादनवाढीसाठी महाबीज निर्मिती करावी: बाबासाहेब कोटकर

नाशिक : २० गुंठे काकडीतून शेतकऱ्याने घेतले साडेचार लाखांचे उत्पन्न

नांदगाव (जि. नाशिक) : सचिन बैरागी तालुक्यातील आमोदे येथील युवा शेतकरी निवृत्ती पुंडलिक पगार यांनी काकडी पिकाच्या माध्यमातून तब्बल साडेचार लाख रुपयांचे उत्पन्न घेतले. 20 गुंठे शेडनेटमध्ये काकडीची लागवड केली होती. ३८ दिवसांनंतर काकडीचे उत्पन्नदेखील सुरू झाले. या काकडीच्या उत्पन्नातून तीन महिन्यांत सुमारे साडेचार ते पाच लाख रुपयांचे उत्पन्न त्यांनी घेतले. पगार यांनी आपली पारंपरिक …

The post नाशिक : २० गुंठे काकडीतून शेतकऱ्याने घेतले साडेचार लाखांचे उत्पन्न appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : २० गुंठे काकडीतून शेतकऱ्याने घेतले साडेचार लाखांचे उत्पन्न

नाशिक : द्राक्ष शेतकऱ्यांना गंडविणारा फरार व्यापारी जेरबंद

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा हस्तेदुमाला शिवारात सहा शेतकऱ्यांचा द्राक्षमाल खरेदी करून त्यांना कोणताही धनादेश अगर पैसे न देता, सुमारे ४९ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या परप्रांतीय व्यापाऱ्यास वणी पोलिसांनी कल्याण तालुक्यामधून हुडकून काढत अटक केली. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना चक्क दोन गावठी कट्टे सापडले. दिंडोरी न्यायालयाने त्याला बुधवार (दि. २८) पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. हस्तेदुमाला …

The post नाशिक : द्राक्ष शेतकऱ्यांना गंडविणारा फरार व्यापारी जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : द्राक्ष शेतकऱ्यांना गंडविणारा फरार व्यापारी जेरबंद

नाशिक : बदलत्या वातावरणाबाबत कृषी विभाग सतर्क ; पावसाच्या वेळेनुसार तयार केले वेळापत्रक

नाशिक : वैभव कातकाडे अल निनोच्या प्रभावामुळे पाऊस लांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे बळीराजाला भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी नाशिक कृषी विभागातर्फे पावसाच्या वेळेनुसार पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. याबाबत कृषी विभागाकडून जनजागृतीही मोठ्या प्रमाणावर करण्यात येणार आहे. त्यामुळे मान्सूनमुळे बळीराजाचे होणारे नुकसान टळण्यास मदत होणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, अल निनोच्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर सन २०२३-२४ मध्ये …

The post नाशिक : बदलत्या वातावरणाबाबत कृषी विभाग सतर्क ; पावसाच्या वेळेनुसार तयार केले वेळापत्रक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बदलत्या वातावरणाबाबत कृषी विभाग सतर्क ; पावसाच्या वेळेनुसार तयार केले वेळापत्रक

नाशिक : कांदा सडल्याने फावड्याने उचलून फेकण्याची वेळ

देवळा (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील कांदा प्रंचड प्रमाणात खराब झाला होता. तशाही परिस्थितीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी अवाच्या सवा खर्च करून कांदा काढून तो चाळीत साठवला. परंतु एक दीड महिन्यातच चाळीतला कांदा सडल्याने त्याला फावड्याने उचलून फेकण्याची वेळ तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला …

The post नाशिक : कांदा सडल्याने फावड्याने उचलून फेकण्याची वेळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कांदा सडल्याने फावड्याने उचलून फेकण्याची वेळ

नाशिक : आठवडाभरात शेतकऱ्यांच्या बँकखात्यात भरपाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यामध्ये मार्च महिन्यातील अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले होते. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावल्याने नुकसानग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी शासनाने ६३ कोटी ९ लाख ७७ हजार रुपयांचे अनुदान उपलब्ध करून दिले आहे. येत्या आठवडारात हे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केले जाऊ शकते. राज्यावर अवकाळीचा फेरा कायम आहे. …

The post नाशिक : आठवडाभरात शेतकऱ्यांच्या बँकखात्यात भरपाई appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आठवडाभरात शेतकऱ्यांच्या बँकखात्यात भरपाई