title नाशिक : नंदूरबार बस स्थानकावर चोरी; महिलेची बॅग कापून सव्वा तोळ्यासह रोख रक्कम लंपास

पिंपळनेर; पुढारी वृत्तसेवा : एसटी महामंडळाची नंदूरबार बस स्थानकावर महिलेच्या बॅगमधून सव्वा तोळ्यांच्या दागिन्यांसह रक्कम चोरी झाल्याची घटना घडली. बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी ही चोरी झाल्याची माहिती महिलेने दिली आहे. या चोरीनंतर नंदुरबार बसस्थानक परिसरात पोलिसांची गस्त वाढवावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

विजयाबाई जगदीश रोकडे (रा. घनश्यामनगर सुरत) या नंदुरबार बस स्थानकावरून दुपारी २.४५ वाजताच्या सुमारास नंदुरबार-नाशिक बसने पिंपळनेर येथे जात होत्या. बंधु सुभाष जगताप यांच्याकडे रक्षाबंधनासाठी जात असताना बसमधे चढतांना त्यांच्या दोन्ही हातात बॅगा होत्या. यावेळी बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी उजव्या हातातील बॅग एका बाजूने कापली. त्यानंतर बॅगमधील सव्वा तोळ्याची सोनपत व 3500 रुपये रोख चोरट्यांनी लंपास केले. त्यामुळे बस स्टॉपवरील प्रवाशांमध्ये भिती पसरली असुन नंदुरबार पोलिसांनी बसस्टॉपवर गस्त वाढवावी व पाकिटमार, सोनपोत लांबवणा-या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

The post title नाशिक : नंदूरबार बस स्थानकावर चोरी; महिलेची बॅग कापून सव्वा तोळ्यासह रोख रक्कम लंपास appeared first on पुढारी.