Toll Relief : टोलनाक्यांवरील वाहतूक कोंडीतून सुटका होणार, नाशिकच्या टोलनाक्यावरून वाहतुकीचा आढावा

<p><strong>नवी दिल्ली :</strong>&nbsp;टोल प्लाझावर (Toll Plaza) वाहने सुरळीत व जलदगतीने जाण्यासाठी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) राष्ट्रीय महामार्गांवरील टोल प्लाझावर गर्दीच्या वेळीही प्रति वाहन 10 सेकंदांपेक्षा जास्त वेळ लागणार नाही याच्या सुनिश्चिततेसाठी मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. टोल प्लाझावर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहने 100 मीटरपेक्षा जास्त रांगा लावून राहणार नाहीत याची खात्री देखील नवीन मार्गदर्शकतत्त्वे करतील.&nbsp;</p> <p>&nbsp;</p>