VIDEO : अखेर संयम सुटला! नाशिकमध्ये ‘रेमडेसिव्हर’साठी भरउन्हात नागरिक रस्त्यावर; जोरदार घोषणाबाजी करीत रोष व्यक्त  

नाशिक : बेडसाठी ऑक्सीजन घेउन कोरोना बाधीतांना आंदोलनाची वेळ आलेल्या नाशिकला आता रेमडेसिव्हर इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. पहाटेपासूनच पाच- पाच तास रांगा लावूनही रेमडेसिव्हर इंजेक्शन मिळत नसल्याने आज संयम सुटलेल्या कोरोना बाधीतांच्या नातेवाईकांनी आज रस्त्यावर उतरुन आंदोलन केले. रास्ता रोको आंदोलनाच्या प्रयत्नातील नातेवाईकांनी उन्हात मेहेर चौकात जोरदार घोषणाबाजी करीत रोष व्यक्त केला. त्यातील एक जण रस्त्यावर कोसळला. 

जोरदार घोषणाबाजी करीत रोष व्यक्त

नाशिकला काही दिवसांपासून रेमडेसिव्हर इंजेक्शनचा काळा बाजार सुरु असून रुग्णालयात अव्वाच्या सव्वा दराने मिळणारे इंजेक्शनसाठी पहाटे पाचपासून रुग्णांच्या नातेवाईकांना पाच पाच तास रांगा लावून इंजेक्शन मिळत नाही. उत्तर महाराष्ट्रातील विविध गावातून लोक रात्री नाशिकला येउन भल्या पहाटेपासून रांगा लावून बसतात. मात्र त्यातील अनेकांना रिकाम्या हाताने परत जावे लागते. अशा संतप्त नागरिकांचा आज संयम ढळला आणि त्यांनी मेहेर 

चौकात सकाळी अकराला रास्ता रोको आंदोलन सुरु केले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत आंदोलकांना बाजूला केले मात्र पालकमंत्री, आमदार खासदारांना भेटायचेच असा आग्रह धऱीत जागेवर जोरदार घोषणाबाजी करीत, आंदोलकांनी पालकमंत्री छगन भुजबळ किंवा महापालिका आयुक्तांना भेटल्याशिवाय जाणार नाही अशी भूमिका घेत घोषणाबाजी करीत, भर दुपारी बाराला भर उन्हात ठाण मांडले. 

पाच पाच तास रांगा 
आंदोलकापैकी सगळ्यांचे नातेवाईक ठिकठिकाणी कोरोनाचे उपचार घेत आहे. त्या सगळ्यांना तेथील डॉक्टरांनी रेमडेसिव्हरच्या प्रस्क्रिप्शन दिल्या आहेत. रुग्णालयात अव्वाच्या सव्वा दराने मिळणाऱ्या १२०० रुपयांच्या इंजेक्शनसाठी मेहेर चौकातील गोळे कॉलनीसह ठिकठिकाणच्या मेडीकल दुकानात पहाटे पाच पासून रुग्णांचे नातेवाईक रांगा लावून असतात. सकाळी अकरापर्यत त्यातील ज्यांना इंजेक्शन मिळतात तर अनेकांना रिकाम्या 
हाताने परत माघारी फिरावे लागते. अशाच आज इंजेक्शन न मिळालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी निराश होउन संयम सुटल्यानंतर आज हे आंदोलन केले. 

हेही वाचा - अवघे गाव हळहळले; दोन दिवसांपूर्वीच्या लेकीच्या लग्नाच्या मांडवातूनच निघाली पित्याची अंत्ययात्रा  

चौघे रुग्णालयात पाचवा रस्त्यावर 
निफाड तालुक्‍यातील प्रशांत गवळी याच्या कुटुंबातील आई-वडील आणि भाउ भावजय असे चौघे पॉझिटीव्ह आहे. घऱातील पाचवा युवक आज नाशिकला इंजेक्शनसाठी आला होता. त्याला इंजेक्शन मिळाले नाही. पहाटेपासून 
रांगेत उभा राहिल्यानंतर सकाळी साडे अकराच्या सुमारास त्यचा संयम सुटला आणि तो रस्त्यावर कोसळला. अखेर मेहेर चौकात वार्तांकनासाठी असलेल्या उपस्थित पत्रकारांनी पाणी देत सावलीत बसविले.  

हेही वाचा - लग्नाच्या तयारीला लागलेल्या वधू-वरांचा हिरमोड! विसंगत आदेशामुळे 'वेडिंग इंडस्ट्री'त गोंधळ