video : अवकाळी पावसासोबतच ढगाळ वातावरणाने द्राक्षउत्पादकांत धास्ती

निफाड (नाशिक) : बदलत्या हवामानाचा फटका गेल्या काही वर्षापासून निफाडच्या पंचवीस हजार हेक्टरवरील द्राक्षउत्पादकांना बसत आहे. यंदाही दिवाळ सणानंतर वातावरणात बदल होत गेला. दोन दिवसांपासून तालुक्याच्या अनेक भागात ढगाळ वातावरण अवकाळी पाऊस बरसला. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांत भितीचे वातावरण आहे

अवकाळीने शेतकरी काळजीत

आधीच चार महीने कोसळलेला पाऊस त्यात बागांची कामे उशिरा सुरु झालेली असतांनाच गेल्या दोन दिवसांपासुन निफाडच्या द्राक्षपंढरीला अवकाळी पावसाने घेरले. थंडी धुके पाऊस आणि ढगाळ वातावरणाचा द्राक्षांबरोबरच गहु, कांदा, हरभरा, भाजीपाला पिकांवर विपरीत परीणाम होत आहे. त्यामुळे पिक वाचवण्यासाठी शेतात फवारणी करतांना शेतकरी दिसत आहे. बदलते हवामान त्यातच खत आणि औषधांच्या वाढलेल्या किंमती यामुळे बळीराजा अस्मानी सुलतानी संकटाने पुरता बेजार झाला. विशेषत: निफाड तालुक्याच्या उगाव, पिंपळगाव, कसबे, सुकेणे, ओझर, पालखेड, खडक माळेगाव, लासलगाव परीसरात द्राक्षाचे मोठे क्षेत्र असून अवकाळीने या भागातीला शेतकऱ्यांना काळजीत टाकले आहे.

हेही वाचा > महाराणीच्या दुर्लक्षित समाधीचा शोध; अंगठीतील हिरा गिळून केला होता देहत्याग

गेल्या चार महीन्यांपासून शेतकरी बेजार झाला. सततचा पाऊस त्यातुनही मार्ग काढत उशिराने बागाची कामे सुरु केली. तर अवकाळीने दस्तक दिली. आधीच शेतीमालाला भाव नाही अन् त्यात या परिस्थितीत बागा वाचवण्यासाठी फवारणीचा खर्च कंबरडं मोडणारा आहे. - विकास रायते, खडक माळेगाव