VIDEO : ग्रामपंचायत निकालाआधीच दोन गटांतील राडा उघड; एकजण गंभीर जखमी

सिडको (नाशिक) : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका वेगवेगळ्या कारणांनी गाजत आहेत. एकीकडे सरपंच पदाच्या निवडीसाठी लिलाव पद्धत तर दुसरीकडे बिनविरोध निवडणूक तर  तिसरीकडे निवडणूक प्रचारावरून तुंबळ हाणामारी होत असल्याचे नकारात्मक व सकारात्मक चित्र बघायला मिळाले. अशातच तालुक्यातील विल्होळी गावात धक्कादायक घटना घडली आहे.

असा आहे प्रकार

तालुक्यातील विल्होळीगावच्या ग्रामपंचायत निवडणूकीदरम्यान दोन गटांमधील तुंबळ हाणामारीची घटना शनिवारी (ता. 16)समोर आली आहे. त्यामध्ये एका युवकाच्या डोक्याला जबर मार लागला, तर कान रक्तबंबाळ झाला. परंतु, चोवीस तास उलटूनही अद्यापपर्यंत यासंदर्भात तालुका पोलीस ठाण्यात कुठल्याही प्रकारची नोंद नसल्याचा अजब गजब प्रकार बघायला मिळत असल्याने संबंधित जखमी युवकाच्या मित्रपरिवाराने माञ यावर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या आहेत. तर यासंदर्भात डीवायएसपी भीमाशंकर ढोले यांनी कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले आहे.

हेही वाचा > ऐनसंक्रांतीच्या सणाला घरावर ओढावली 'संक्रांत'; लेकाला उराशी धरुन मातेचा जीवघेणा आक्रोश

घटना घडूनही पोलिसांनी त्याचे गांभीर्य दाखवले नाही. गुन्हा दाखल करण्यास वेळ घालवला. मुख्य आरोपीस त्यांनी बगल देण्याचे काम केले आहे. - नितीन भावनाथ, फिर्यदीचे मित्र

हेही वाचा > ढोंगीबाबाचा कारनामा! आधी खड्याचा केला रुद्राक्ष अन् नंतर केले असे काही; रवानगी थेट पोलिस ठाण्यातच