VIDEO : नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी कोरोनामुक्त; डॉक्टरांचे मानले आभार

नाशिक : जिल्ह्या‍‍त कोरोनामुक्‍त झालेल्‍या रुग्‍णांमध्ये दैनंदिन आढळणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या अधिक राहात असल्‍याने पुन्‍हा ॲक्टिव्‍ह रुग्‍णसंख्येत वाढ होऊ लागली आहे. हिवाळ्यात शहरात कोरोनाचे रुग्ण वाढून दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या दरम्यान नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी हे कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना सात दिवसानंतर सह्याद्री हॉस्पिटल येथून डिस्चार्ज देण्यात आला. 

मागच्या आठ महिन्यांपासून नाशिककर आणि स्वतःची काळजी घेत आहे. सर्व नियम पाळले आणि सगळ्यांना पाळायला लावले. कोरोनाला हलक्यात घेऊ नका, सगळ्यांनी नियम पाळा असे कुलकर्णी यांनी यावेळी सांगीतले. त्यांनी मागच्या तीन दिवसांपासून त्यांना कसलाही त्रास होत नसल्याचे सांगत, डॉक्टरांचे देखील आभार मानले.

हेही वाचा >  मध्यरात्री रस्त्याजवळ अज्ञातांनी आणला शिवाजी महाराजांचा पुतळा; परिसरात खळबळ

महापौरांना सोमवार (ता. १६) कोरोनाची लक्षणे जाणवू लागली. त्यानंतर शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सतीश कुलकर्णी यांची देखील कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर कुलकर्णी यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले. तर त्यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आढळली. तेव्हापासून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. उपचारानंतर त्यांना आज घरी सोडण्यात आले आहे. 

हेही वाचा > निफाडच्या नगरसेवकाला लाखोंचा गंडा! बाजूने निकाल लावून देण्याच्या बोलीवर उकळले २० लाख

रविवारी (ता.२२) दिवसभरात २३३ कोरोना बाधित आढळले असताना १७४ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली. चार रुग्‍णांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला. यातून जिल्ह्यातील ॲक्टिव्‍ह रुग्‍णसंख्येत ५५ ने वाढ झाली असून, सद्यःस्‍थितीत जिल्ह्या‍त दोन हजार ६११ बाधितांवर उपचार सुरू आहेत. 