VIDEO : पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादीचे रास्ता रोको आंदोलन

विंचूर (नाशिक) :  पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसचे दर कमी करण्यासाठी केंद्रातील भाजप सरकारने तातडीने हस्तक्षेप करून इंधनाचे भाव कमी करावेत व सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार यांनी केली आहे.

पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या दरवाढीच्या निषेधार्थ नाशिक जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने नाशिक -औरंगाबाद राज्य महामार्गावरील विंचूर चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, पुरुषोत्तम कडलग, राजेंद्र डोखळे, हरिश्चंद्र भवर, बबन शिंदे आदींची भाषणे झाली. पेट्रोल, डिझेलची मोठया  प्रमाणात दरवाढ झाल्याने महागाईचा भडका उडाला असून केंद्रातील मोदी सरकारला सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नांशी कुठलेही देणेघेणे नसल्याने सरकारचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा - लग्नाच्या दोनच दिवसांत नवरी पसार! पुण्यातील नवरदेवाची लाखोंची फसवणूक

 कॉंग्रेस आघाडी सरकारच्या काळात इंधनाचे दर थोडेफार वाढले की, बहुत हुई मेहंगाई कि मार... अशी घोषणा देणारे नेते आता पेट्रोलचे भाव ९५ रुपये तर डिझेलचे भाव ८४ रुपये प्रति लिटर झाले तरी शांत का असा सवाल देखील उपस्थीत केला. पेट्रोल डिझेलचे भाव कमी झालेच पाहिजेत यासोबतच केंद्र सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त करून आंदोलकांकडून घोषणाबाजी करण्यात आली.

हेही वाचा - ऑनलाइन गेम ठरतायत विद्यार्थ्यांच्या भविष्याला घातक! मानसिक गुंता सोडविण्यासाठी तज्ज्ञांकडे गर्दी 

पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या दरवाढीच्या निषेधार्थ राज्य महामार्गावरील विंचूर चौफुली येथे झालेल्या रास्ता रोको आंदोलनात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रनाना  पगार, युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलक आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.