VIDEO : बहुजन शेतकरी संघटनेकडून शेतकरीविरोधी कायद्यांची होळी 

नाशिक रोड : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध दर्शविण्यासाठी, तसेच शेतकऱ्यांच्या हक्कासाठी संयुक्त किसान मोर्चातर्फे भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी बहुजन शेतकरी संघटनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे निदर्शने करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर केंद्र सरकारच्या तीन काळ्या कृषी कायद्यांची होळी करण्यात आली. 

 

या वेळी मोदी सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या, तसेच शिवाजी महाराज पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत फेरी काढून व्यावसायिकांना बंदमध्ये सामील होण्याचे आवाहन केले. या वेळी अशोक खालकर, दत्ता गायकवाड, रमेश औटे, बळवंत गोडसे, सुदाम बोराडे, मनोहर कोरडे, पी. बी. गायधनी, शांताराम भागवत, नामदेव बोराडे, मधुकर सातपुते, जगन आगळे, मनोहर कोरडे, नाना नागरे, बाळासाहेब भोर, शांताराम सांगळे, केशव बोराडे, सुनील बोराडे, रामनाथ भागवत, नंदू सोनवणे, नाना पगारे, कबीर औटे आदी उपस्थित होते.   

हेही वाचा - सख्ख्या भावांची एकत्रच अंत्ययात्रा पाहण्याचे आई-बापाचे दुर्देवी नशिब; संपूर्ण गाव सुन्न