VIDEO : मनुवादाला विरोध म्हणून होणार ‘संविधान सन्मान विद्रोही साहित्य संमेलन’; स्वागताध्यक्षांची माहिती

नाशिक रोड : मनुवादाला विरोध म्हणून आम्ही विद्रोही साहित्यिकांसाठी विद्रोही साहित्य संमेलन घेत असून, यात सर्व जाती धर्माच्या लोकांना संधी दिली जाणार आहे. संविधान सन्मान विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी यशवंत मनोहर यांच्या नावाची चर्चा असून येत्या 14 तारखेला त्यावर अधिकृत शिक्कामोर्तब होणार असल्याचे संविधान सन्मान विद्रोही साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शशिकांत उन्हवणे यांनी सांगितले.

संविधान असणार संमेलनाचा गाभा

94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मनुवाद डोकावतो आहे श्रद्धा अंधश्रद्धा अनिष्ठ रूढी परंपरा कर्मकांड यांचा नायनाट करण्यासाठी व जनजागृती करण्यासाठी आम्ही प्रति साहित्य संमेलन म्हणून संविधान सन्मान विद्रोही साहित्य संमेलन 26 ते 29 मार्च दरम्यान घेणार आहोत असे आयोजकांनी सांगितले. या संमेलनाचा संविधान हा मूळ गाभा असणार आहे. या संमेलनाला ज्येष्ठ विद्रोही विचारवंत व साहित्यिक यशवंत मनोहर यांना संमेलनाचे अध्यक्षस्थान आम्ही सर्वानुमते व सन्मानाने देणार आहोत असे आयोजकांनी दैनिक सकाळला सांगितले आहे.

हेही वाचा - अखेर त्या 'बालिकावधू'ची मृत्युशी झुंज संपली; विवाह तिच्यासाठी ठरला मृत्यूचे फर्मानच

शासनाने 25 लाख निधी द्यावा 

अखिल भारतीय संमेलनासाठी शासन 50 लाख रुपये देते तर विद्रोही साहित्य संमेलनासाठी शासनाने 25 लाख रुपयांचा निधी तरी उपलब्ध करून द्यावा, यातून शोषित गरीब वंचित घटकांचा साहित्य उजेडात येण्यास मदत होऊन कर्मकांडे अनिष्ठ रूढी परंपरा यांचा जागर समाजात व्हायला हातभार लागणार आहे. म्हणून शासनाला लेखी स्वरूपात आम्ही आर्थिक मदत मागणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.

हेही वाचा - ही कसली स्टंटबाजी? पठ्ठ्याचे शेतात चक्क बिबट्यासोबत फोटोसेशन; VIDEO व्हायरल

प्रतिक्रिया शासनाने विद्रोही साहित्य संमेलनासाठी दरवर्षी निधी उपलब्ध करून द्यायला हवा संविधान सन्मान विद्रोही साहित्य संमेलन यंदाच्या वर्षापासून सुरू करण्याचा पायंडा आम्ही पाडत असून मनुवादाला विरोध म्हणून आम्ही हे साहित्य संमेलन आयोजित करीत आहोत. यात शोषित वंचित दुर्लक्षित साहित्यिकांचे साहित्यावर विचार मंथन करणार असून दिग्गज विद्रोही साहित्यिक या संमेलनात हजेरी लावणार आहेत. - शशिकांत उन्हवणे, स्वागताध्यक्ष, संविधान सन्मान विद्रोही साहित्य संमेलन