VIDEO : “मास्क काढ तो” राज ठाकरेंचा माजी महापौरांना इशारा; विनामास्क नाशिकमध्ये दाखल

नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आज (ता.५) तब्बल सव्वा वर्षानंतर नाशिकमध्ये आगमन झाले आहे. यावेळी विना मास्कचं राज ठाकरे नाशिकमध्ये दाखल झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. तसेच राज ठाकरे यांनी "मास्क काढ" असा इशारा यांनी माजी महापौर अशोक मुर्तडक यांना यावेळी केला. 

विनामास्कचं राज ठाकरे नाशिकमध्ये दाखल .

मनसे अध्यक्ष राज ठाकरे तब्बल सव्वा वर्षानंतर नाशिकमध्ये येत असल्याने मनसे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ठाकरे व फडणवीस हे एकाच हेलिकॉप्टरने येणार असल्याने आगामी महापालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आगामी महापालिका निवडणुकीत मनसे व भाजप एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महापालिकेत भाजपला मनसेची साथ मिळाली आहे. स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत मनसेने भाजपला खुले समर्थन दिल्याने युती अधिक घट्ट झाली आहे. त्याशिवाय मनसेंतर्गत निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याने राज ठाकरे काय भूमिका घेतात, याकडे मनसैनिकांचे लक्ष लागले आहे. 

मी मास्क घालतच नाही. तुम्हालाही सांगतो,'

मराठी भाषा दिनानिमित्त २७ फेब्रुवारी रोजी मुंबईत मनसेनं शाखा-शाखांवर 'मराठीतून स्वाक्षरी' कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यापैकी एका कार्यक्रमात राज ठाकरे स्वत: सहभागी झाले होते. मात्र, त्यांनी मास्क लावले नव्हते. याबद्दल पत्रकारांनी राज ठाकरे यांना प्रश्न विचारला. त्यावर, मी मास्क घालतच नाही. तुम्हालाही सांगतो,' असं ते म्हणाले होते. राज यांच्या या वक्तव्यामुळं उलटसुलट चर्चा रंगली होती.

हेही वाचा - तरुणाच्या आत्महत्येसाठी पुन्हा पोलीसच जबाबदार? चिठ्ठीत धक्कादायक खुलासा