VIDEO : लासलगावला कांदा गुदामाला आग; धान्य, कांद्याचे मोठे नुकसान

लासलगाव (जि. नाशिक) : येथील साईबाबा ट्रेडिंग कंपनीच्या कांदा गुदामाला शुक्रवारी (ता. ९) भीषण आग लागली. या दुर्घटनेत धान्य, कांदा व बारदानाचे सुमारे आठ ते दहा लाखांचे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. 

 

 

शुक्रवारी दुपारी एकच्या दरम्यान साईबाबा ट्रेडिंग कंपनीच्या लासलगाव-विंचूर रस्त्यावरील कांदा खळ्यावरील गुदामाच्या मागील बाजूने आग लागली. या आगीने कांदा भरण्याच्या गोण्या, धान्य व कांद्याचे नुकसान झाले.

आग लागल्याचे समजताच कामगारांनी शेडबाहेर पळ काढला.  आग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आठ ते दहा लाखांचे नुकसान झाले. आगीचे वृत्त कळताच वीज महावितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित केला. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी येवला व पिंपळगाव बसवंत येथील अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी हजर झाले. दीड ते दोन तासांत आगीवर नियंत्रण मिळवता आले. 

हेही वाचा - जेव्हा लसीकरण केंद्रावर पोचला 'कोरोनाबाधित'..! उपस्थितांमध्ये पळापळ आणि खळब