VIDEO : सिन्नरच्या बांधकाम विभागाच्या गोडाऊनला आग; फर्निचर साहित्य जळाले

सिन्नर (जि. नाशिक) :  आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास सिन्नर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालया मागील गोडाउन मध्ये अचानक आग लागल्याची घटना घडली. नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाने ही आग लागली विझवली. या आगीत गोडाऊन मधील जुनाट साहित्य काही अंशी जळाल्याची माहिती देण्यात आली.

 

सिन्नरच्या गावठा परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय आहे. उपविभागीय अभियंत्यांच्या कार्यालयामागील जागेत असणाऱ्या गोडाऊन मधून दुपारी तीन वाजेच्या सुमारास धुराचे लोळ निघू लागल्यावर सिन्नर नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले. नगरपालिकेच्या बंबांने घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली. गोडाऊन मधे अडगळीचं सामान ठेवले होते. तिथल्या खिडक्यांंना वेल्डिंग करतांना ठिणगी उडाल्याने आग लागली आहे.आगीत कोणतेही नुकसान नाही.

हेही वाचा> काय सांगता! विवाह आणि तो ही फक्त ५१ रुपयांत; कोणीही मोहिमेत होऊ शकतं सहभागी  

यासंदर्भात उपविभागीय अभियंता प्रवीण भोसले यांच्याशी संपर्क साधला असता गोडाऊन मधील जुने फर्निचर साहित्य काहीअंशी जळाल्याचे त्यांनी सांगितले. उपस्थितांकडून मात्र जुने कागदपत्र आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचे सांगण्यात येत होते. ही आग कशामुळे लागली याबाबत अधिकृत माहिती मिळाली नाही.

हेही वाचा> बहिणीपाठोपाठ भावाची उत्तुंग कामगिरी! एकाच आठवड्यात सुराणा कुटुंबाला जणू जॅकपॉट