VIDEO : पोलीस आयुक्त पांडे यांचा “ग्रीन ज्यूस” फंडा! मुंबई पाठोपाठ नाशिक पोलीस विभागात जोरदार चर्चा

सिडको (नाशिक) : नाशिक शहराचे नवनियुक्त पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी पोलिस कर्मचाऱ्यांबरोबर नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन सर्वांना "ग्रीन ज्यूस" घेण्याचा सल्ला दिला आहे. सध्या याबाबत जोरदार चर्चा मुंबई पाठोपाठ नाशिक पोलीस विभागात ऐकायला मिळत आहे.

मुंबई पाठोपाठ नाशिक पोलीस विभागात जोरदार चर्चा

कोरोनाच्या महामारी मुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. कोरोना होऊ नये म्हणून मास्क, सोशल डिस्टन्स व सॅनीटायझर हे उपाय आता प्रत्येकाला तोंडपाठ झाले आहेत. एवढेच नव्हे तर ते अंगवळणी पडले आहेत. परंतु बाह्य उपाया बरोबर शरीराच्या अंतर्गत उपाय सांगण्याचा सल्ला दिला आहे, तो म्हणजे नाशिक शहराचे नवनियुक्त पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी ! त्यांच्या या रामबाण घरगुती उपायांची सध्या पोलिस वर्तुळात जोरदार चर्चा मिळत आहे. तर बहुतेक जण त्याचे अनुकरण देखील करत आहे. अशीच काहीशी चर्चा अंबड पोलीस ठाण्यात एकाला मिळाली.

 

 

हेही वाचा > चालकाच्या डोळ्यादेखत घडत होता तरुणाच्या मृत्यूचा थरार! थरारक प्रसंग

चांगला परिणाम शरीरावर

पोलीस आयुक्त साहेबांनी सांगितलेल्या "ग्रीन ज्यूस" चे सेवन आम्हीं करीत आहोत. याचा हळू हळू चांगला परिणाम शरीरावर जाणवत आहे. पोलिसांनीच नव्हे तर नागरिकांनी सुद्धा ज्यूसचे सेवन केले पाहिजे.- कुमार चौधरी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंबड पोलीस ठाणे

हेही वाचा > ह्रदयद्रावक! लक्ष्मीपूजन आटोपले आणि वैभवची जीवनयात्राही आटोपली; ऐन दिवाळीत कुटुंबाच्या आनंदावर नियतीचा घाला

ग्रीन ज्यूसचा (रेसिपी) फंडा

दोन आवळे, तुळशीचे पाच ते दहा पाने, बेलपत्राचे पाच ते दहा पाने, कोथिंबीर पाच ते दहा पाने, पालक पाच ते दहा पाने व चवीला मीठ याचे एकत्रीकरण करून मिक्सरमध्ये ज्यूस बनवणे.

वेळ : सकाळ, दुपार व सायंकाळी जेवणापूर्वी एक तास अगोदर तीन टाईम सेवन करणे. 

फायदा : सर्दी, व खोकल्याचा त्रास कधीच होत नाही. तसेच प्रतिकार क्षमता वाढविण्यास मदत होते.