VIDEO : ”…तर अवजड वाहने जाळून टाकण्यात येतील”; राणे प्रतिष्ठानचा इशारा

नाशिक रोड : गेल्या तीन महिन्यांत नाशिक रोड परिसरात अवजड वाहनांमुळे अनेक लोकांचे प्राण गमावले आहे. नाशिक रोड येथे अवजड वाहनांना परवानगी नसतांनाच जेलरोड येथे कायदा-सुव्यवस्था मोडून अवजड वाहने मार्गक्रमण करीत आहे. यापुढे अवजड वाहनांमुळे अपघात झाल्यास अवजड वाहने जाळून टाकण्याचा इशारा 'राणे प्रतिष्ठान'च्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाद्वारे दिला आहे. नाशिक रोड परिसरात हा मुद्दा सध्या मोठ्या चवीने चर्चिला जात आहे.

सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल...

तीन महिन्यांत नाशिक रोड परिसरात चौदा लोकांचे प्राण गेले. याआधी जेलरोडला अवजड वाहनांमुळे शेकडो लोक मृत्यूमुखी पडल्याची नोंद सरकार दप्तरी आहे. अनेक सामाजिक संघटनांनी राजकीय पक्षांनी नागरिकांनी अवजड वाहनांना प्रवेश देऊ नये यासाठी आंदोलने केली. मात्र त्यांचे आंदोलने आजपर्यंत निरर्थक ठरले. याच पार्श्वभूमीवर राणे प्रतिष्ठानच्या प्रसाद जमखिंडीकर यांनी अवजड वाहनांना जेलरोडला प्रवेश देऊ नये. अवजड वाहनांमुळे अपघात झाल्यास अवजड वाहने जाळून टाकण्यात येतील असा इशारा सोशल मीडियाद्वारे राणी प्रतिष्ठानने दिला आहे.

सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल करीत राणे प्रतिष्ठानचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख प्रसाद जामखिंडीकर, मुन्ना शेख, आकाश जगताप, दिनेश खरे, देवा साळवे मयूर जानराव, अजय पवार, आकाश गाणी आदींनी इशारा दिला आहे.