Water Scarcity : भटकंती… पिण्याच्या पाण्यासाठी

नाशिक : हरसूल रस्त्यावर देवरगाव या आदिवासी गावाच्या अगदी जवळ धरण असूनही आदिवासी महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी चकाकणाऱ्या डांबरी रस्त्यांवरून डोक्यावर एकावर एक हंडे ठेवून भा उन्हात पाणी शोधत भटकंती करावी लागत आहे.

एकीकडे समर कॅम्प मध्ये शाळकरी मुलांनी उन्हाळी शिबीर गजबजलेली दिसून येत आहे. तर दुसरीकडे उन्हाळी पाण्यासाठी भटकंती असे विदारक चित्र समोर येत आहे. नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या. मात्र यामध्ये आपत्ती पूर्व तयारी व आपत्ती सज्जता विभागाला दुष्काळी भागातील पाणीटंचाई दिसली नसावी काय? दुर्गम भागात शाळकरी लहान मुली हंडे डोक्यावर घेऊन चालताना बघावयास मिळत आहेत. या रस्त्याजवळ शेती करण्यासाठी अनेक वसाहती झाल्या असून, उन्हाळ्यात धरणातील पाणी संपत आल्यावर त्यांना पाण्यासाठी फिरावे लागते. चकाकणाऱ्या डांबरी रस्त्यावरून पायाला चटके लागत असताना चार-चार हंडे एकावर एक घेऊन प्रवास करणाऱ्या महिलांची ही बोलकी चित्रे. (सर्व छायाचित्रे : आनंद बोरा)

हेही वाचा: