WEB EXCLUSIVE : केमिकलचा वापर करून भाजीपाला होतोय टवटवीत? ABP Majha

<p><strong>नाशिक :</strong>&nbsp;'केमिकलचा वापर करून भाजीपाला टवटवीत केला जातो, व्यापारी ग्राहकांची फसवणूक करतात' या आशयाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयात तुफान व्हायरल होत आहे. मात्र हा सर्व प्रकार खोटा असल्याचं एबीपी माझाच्या रिअलिटी चेकमध्ये समोर आलं आहे..</p> <p>'केमिकलचा वापर करून भाजीपाला टवटवीत केला जातो, व्यापारी ग्राहकांची फसवणूक करतात' या आणि अशा विविध मेसेजेसमुळे भाजीपाला खरेदी करतांना आपली फसवणूक तर होत नाहीय ना? रोजच्या जेवणात शिळा भाजीपालाच आपण ताजा आहे समजून खात नाहीय ना? असे अनेक प्रश्न नागरिकांच्या मनात उपस्थित होत आहे. दरम्यान एबीपी माझाने या संपूर्ण प्रकरणाचा रिअलिटी चेक केला.&nbsp;</p>