Wedding Permission | नाशिकमध्ये पुढील आदेशापर्यंत मंगल कार्यालयं आणि लॉन्समध्ये लग्न सोहळ्यावर बंदी

<p>कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नाशिकमध्ये मंगल कार्यालयं आणि लॉन्सवर लग्नसोहळ्याला बंदी घालण्यात आली आहे. मात्र ऐन लग्नसराईत असे निर्बंध आल्यानं मंगल कार्यालय चालक- मालक मात्र हवालदिल झाले आहेत. हॉटेल-बार या ठिकाणीदेखील गर्दी होते मग निर्बंध केवळ मंगल कार्यालयावर का असा प्रश्न त्यांनी केला आहे. लॉकडाऊमध्ये आर्थिक नुकसान झाल्यानं पुन्हा तोच फटका नको यासाठी मोजक्या लोकांच्या उपस्थित समारंभाला परवानगी द्यावी अशी मागणी या चालकांनी प्रशासनाकडे केली आहे.</p>