Site icon

Yeola Paithani : आता नाशिकरोड रेल्वेस्थानकावर मिळणार येवल्याची पैठणी

नाशिकरोड: पुढारी वृत्तसेवा

संपूर्ण भारतात महाराष्ट्रातील येवल्याच्या पैठणीची भुरळ महिलावर्गाला आहे. पैठणी सहजगत्या प्रवासात देशातील महिलांना उपलब्ध व्हावी, यासाठी नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर पैठणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत ‘वन प्रॉडक्ट वन स्टेशन’ हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

नाशिकरोड रेल्वेस्थानकावर गुरुवारी (दि. 29) आमदार ॲड. राहुल ढिकले, माजी आमदार बाळासाहेब सानप, भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे आदींच्या उपस्थितीत या स्टॉलचे उद्घाटन केले जाणार आहे. रेल्वेस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दर्शनी भागात हा स्टॉल उभारण्यात आला आहे. पाचशे रुपयांपासून ते वीस हजारांपर्यंतच्या पैठणी येथे उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे वीस हजारांपेक्षा अधिक रकमेच्या पैठणी मागणीप्रमाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

उद्घाटनाच्या अगोदरच प्रतिसाद

उद्घाटनाच्या एक दिवस अगोदरच पैठणीची विक्री जोरात झाली आहे. ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. यामुळे आता येवल्याच्या पैठणीची मागणी वाढू शकते.

येवल्याची प्रसिद्ध पैठणीचा स्टॉल नाशिकरोड रेल्वेस्थानकावर सुरू केला आहे. आत्मनिर्भर योजनेंतर्गत या स्टॉलला परवानगी मिळाली आहे. ग्राहकंचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. अपेक्षापेक्षा अधिक विक्री होईल.

– मंदा फड, संचालिका, येवला पैठणी

हेही वाचा :

The post Yeola Paithani : आता नाशिकरोड रेल्वेस्थानकावर मिळणार येवल्याची पैठणी appeared first on पुढारी.

Exit mobile version