Site icon

कोजागिरी पोर्णिमा : वणीत जलाभिषेकासाठी दाखल झाले हजारो भाविक

वणी : पुढारी वृत्तसेवा
येथे कोजागरी पौर्णिमेनिमित्त जगदंबामातेच्या जलाभिषेकासाठी राज्यातून तसेच परराज्यातून हजारो भाविक दाखल झाले आहेत.

कोजागरी पौर्णिमेनिमित्त आदिशक्ती सप्तशृंगीमातेच्या अभिषेक विधीसाठी हजारो कावडधारक दरवर्षी पुणे येथून मुळा नदीचे, साक्री, पिंपळनेर, शहादा, असलोदा येथून तापीचे, ओमकारेश्वर, इंदूर येथून नर्मदेचे, उज्जैन येथून क्षिप्रा नदीचे तीर्थ, त्र्यंबकेश्वर येथून कुशावर्ताचे व नाशिक पंचवटी येथून रामकुंडातून गोदावरीचे, कसमादे भागातील मोसम, गिरणा नदीचे जल (तीर्थ) घेऊन गडावर आदी ठिकाणांहून 400 ते 600 किमी अंतरावरून अनवाणी प्रवास करून कोजागरीच्या पूर्वसंध्येस वणी गाव व सप्तशृंगगड व परिसरात दाखल होत आहेत. वणी जगदंबा मंदिरात ट्रस्टच्या वतीने नाश्त्याची सुविधा करण्यात आली होती. वणीतील मशीद येथे मुस्लीम पंच कमिटीच्या वतीने जेवण वाटप केले गेले. यावेळी बंटी सय्यद, बब्बूभाई शेख, शौकत मणियार, जमीरभाई शेख, फईम काजी व मुस्लीम बांधव उपस्थित होते.

हेही वाचा:

The post कोजागिरी पोर्णिमा : वणीत जलाभिषेकासाठी दाखल झाले हजारो भाविक appeared first on पुढारी.

Exit mobile version