Site icon

नवरात्रोत्सव :  ५८ फुटी रावण पुतळा दहन; पन्नास हजाराच्यावर भाविकांच्या उपस्थितीची शक्यता

नाशिकरोड $: पुढारी वृत्तसेवा

गांधीनगरच्या ऐतिहासिक रामलिलेचा समारोप बुधवारी, दि.5 दसऱ्याला रावण दहनाने होणार आहे. सायंकाळी सातला रावणाचा 58 फुटांचा पुतळा दहन केला जाणार आहे. सीयावर रामचंद्र की जय, जय श्रीराम अशा जयघोषात व फटाक्यांच्या नयनरम्य आतषबाजीत होणारा हा कार्यक्रम पाहण्यासाठी पंचक्रोशीतून पन्नास हजारावर भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. राम व रावण सेनेचे जोरदार युध्द झाल्यानंतर रावण दहन केले जाईल.

रावणदहन कार्यक्रमाला राष्ट्रपती पुरस्कारविजेते ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक शाहील हाडा, रामलीला समितीचे महासचिव कपिल शर्मा, दसरा समिती अध्यक्ष पप्पू कोहली, दिग्दर्शक हरिष परदेशी, संजय लोळगे, प्रदीप भुजबळ, मनोहर बोराडे, सुनील मोदीयानी, भरत राव, सागर पुरी, साहिल शर्मा, तस्लीम पठाण आदींची प्रमुख उपस्थिती राहील रावण दहनासाठी किमान 50 हजार भक्त हजेरी लावतात. कार्यक्रमानंतर नाशिक-पुणे मार्गावरील वाहतूक खंडीत होऊ नये म्हणून वाहतूक व उपनगरच्या पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. रावण दहनावेळी रामायणातील सर्व पात्रे वेशभूषेसह सहभागी होतात. १९५४ पासून चालत आलेली ही परंपरा आजपर्यंत टिकून आहे. दसरा समितीचे अध्यक्ष पप्पू कोहली म्हणाले की, सर्व तयारी पूर्ण झालेली असून पोलिंनी पाहणी केली आहे. रामभक्तांनी गाड्या सुरक्षित अंतरावर पार्क कराव्यात.

हेही वाचा:

The post नवरात्रोत्सव :  ५८ फुटी रावण पुतळा दहन; पन्नास हजाराच्यावर भाविकांच्या उपस्थितीची शक्यता appeared first on पुढारी.

Exit mobile version