Site icon

नाशिक : बाजारात फटाक्याच्या आवरणात भाज्यांची बियाणे

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
फटाक्यासारख्या दिसणार्‍या आवरणात विविध भाज्या तसेच झाडांचे बीज बाजारात उपलब्ध झाले आहे. हा फटाका कुंडीत पेरून त्यातून रोप उगवते. एस. जी. पब्लिक सकूलच्या प्राथमिक विभागामध्ये पालकांना नवसंकल्पना देण्यात आली. पालक मेळाव्यात या संकल्पनेचे स्वागत करण्यात आहे.

माध्यमिक लोक शिक्षण मंडळाचे सचिव राजेश गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली ही संकल्पना मांडली. मुख्याध्यापक उदय कुदळे यांनी प्रात्यक्षिक सादर केले. जयश्री सोनजे, वृषाली जाधव, सतीश बनसोडे, नीलेश मुळे उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी म्हणून मध्यप्रदेशमधील इंदूर येथून पर्यावरणपूरक फटाके (सीड बेस क्रॅकर) मागविण्यात आले. फटाक्यांचे आवरण असले तरी त्यात विविध भाज्या, फळ बिया, रान भाज्यांचे तसेच विविध झाडांचे बीज असते. फटका कुंडीत लावल्यानंतर त्याला कालांतराने अंकुर फुटतात व नंतर त्याची लागवड व संवर्धन करून कोणत्याही रासायनिक खताचा वापर न करता शुध्द भाजी, फळे मिळतील अशी संकल्पना राजेश गडाख यांनी मांडली. या उपक्रमाचे प्रात्यक्षिक मुख्याध्यापक कुदळे यांनी करून दाखविले. पर्यावरणाची गोडी वाढावी म्हणून ही संकल्पना मांडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांचा कृतियुक्त शिक्षणावर भर : कुदळे
विद्यार्थीकेंद्रित शिक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून दर शनिवारी पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे पालक-शिक्षक यांचा मेळावा घेतला जातो. दुसरीच्या वर्गाचा शिक्षक-पालक मेळावा झाला. यात नवसंकल्पना मांडण्याबरोबरच बरोबरच विद्यार्थी गुणवत्ता वाढीविषयी चर्चा झाली. कृतियुक्त शिक्षण देण्यावर जास्त भर दिला जात असल्याने मुख्याध्यापक कुदळे यांनी सांगितले.

हेही वाचा :

The post नाशिक : बाजारात फटाक्याच्या आवरणात भाज्यांची बियाणे appeared first on पुढारी.

Exit mobile version