Site icon

जळगावात सीबीआयची छापेमारी; ज्वेलर्स, दोन वाहनासह शोरुममध्ये झाडाझडती

जळगाव: पुढारी वृत्तसेवा

जळगाव शहरातील ‘आरएल’ समूहाचे ज्वेलर्स शोरुम, दोन वाहन शोरुममध्ये सीबीआयने तपासणी केली. एसबीआयने ५२६ कोटींच्या थकीत कर्जाबाबत नवी दिल्ली येथे सीबीआय कार्यालयात दाखल केलेल्या तक्रारीवरून सीबीआयच्या ६० अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने सर्व ठिकाणी एकाचवेळी ही कारवाई केली.

आरएल‎ ज्वेलर्सचे संचालक ईश्वरलाल जैन यांना सर्च वॉरंट‎ दाखवून निवासस्थानात एका पथकाने सर्चिंगला सुरुवात‎ केली. त्यानंतर दुसऱ्या पथकातील‎ अधिकाऱ्यांनी आरएल‎ ज्वेलर्समध्ये तपासणी केली.‎ त्यापाठोपाठ आरएल समूहाच्या‎ औद्योगिक वसाहतीत असलेल्या‎ मानराज मोटर्स या ठिकाणी सहा‎ जणांच्या पथकाकडून तर‎ महामार्गावर भुसावळ रस्त्यावरील‎ नेक्सा या शोरूममध्ये कागदपत्रांची‎ तपासणी करण्यात आली.

स्टेट बँकेनं दिली होती तक्रार…
आरएल समूहाने स्टेट बँकेकडून ५२६ कोटींचे कर्ज घेतले आहे. ते २००९ पासून थकीत होऊन खाते एनपीए झाले. या कर्जापोटी एसबीआयने आरएलच्या तीन ते चार मालमत्ता जप्त करून त्यांची विक्री केली आहे. तसेच बँक खात्यातील मुदत ठेव व रक्कम असे सुमारे १० कोटी रुपये बँकेने वसूल केले आहे. बँकेच्या म्हणण्यानुसार आरएल समूहाकडे १५०० कोटी रुपये कर्ज बाकी आहे. त्यामुळे स्टेट बँकेने सीबीआयकडे तक्रार दिली होती.

हेही वाचा:

The post जळगावात सीबीआयची छापेमारी; ज्वेलर्स, दोन वाहनासह शोरुममध्ये झाडाझडती appeared first on पुढारी.

Exit mobile version