Site icon

जळगाव : दुकानातील कामगारच निघाला मास्टरमाईंड, व्यापाऱ्याची 8 लाखांची रोकड लांबविली

जळगाव : शहरातील मसाला व ड्रायफ्रूट व्यापाऱ्याकडील 8 लाखांची रोकड लांबवल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील दुकानातील कामगारच मास्टरमाईंड निघाला असून त्याच्या अन्य चार साथीदारांना गुन्हे शाखा व एमआयडीसी पोलिसांनी संयुक्त कारवाईत अटक केली आहे. त्यातील एका विरोधात सात गुन्हे दाखल असून अन्य चौघांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली जात आहे.

ईश्वर बालू मेघाणे (सिंधी कॉलनी, जळगाव) हे आपल्या परीवारासह वास्तव्याला आहे. त्यांचे दाणा बाजार परीसरात बाबा हरदासराम ट्रेडर्स नावाचे होलसेल मालाचे दुकान आहे. 23 जानेवारी रोजी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे दुकान बंद करून उधारीचे व दिवसभरात दुकानातील माल विक्री करून मिळालेली एकूण 8 लाख रुपयांची रोकड पिशवीत ठेवली होती. सोबत लॅपटॉप, मोबाईल, चार्जर, हार्डडिस्क आणि दुकानातील डायरी अशा देखील वस्तू ठेवलेल्या होत्या. रात्री ते दुचाकीने घरी जात असताना शहरातील पंचमुखी हनुमान मंदिर परिसरात असलेल्या रामदेवबाबा मंदिरासमोर जात असताना दोन जण दुचाकीने येवून त्यांच्या दुचाकीला कट मारला. त्यामुळे ईश्वर मेघांनी यांनी दुचाकी हळू चालवत होते. त्यानंतर यातील एक जणांनी त्यांच्या दुचाकीला लावलेली 8 लाख रुपये असलेली पिशवी व मुद्देमाल जबरी हिस्कावून चोरून नेला होता. या संदर्भात त्यांनी आरडाओरड केली. तोपर्यंत चोरटे पसार झाल होते. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

नगर : पोलिसांविरोधात नागरिकांचा मूकमोर्चा

गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी जाळ्यात

पोलिसांनी गोपनिय माहितीच्या आधारे जळगाव स्थानिक गुन्हे शाखा आणि एमआयडीसी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत वेगवेगळ्या तीन पथक तयार करून आरोपींचा पर्दाफाश केला आहे. या गुन्ह्यात एकूण पाच जणांना अटक करण्यात आली. आरोपींची ओळख परेड बाकी असल्याने त्यांची नावे जाहीर करण्यात आलेली नाही.

यांनी केली कारवाई…

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सुधाकर अंभोरे, विजयसिंह पाटील, जितेंद्र पाटील, अक्रम शेख, महेश महाजन, विजय पाटील, नितीन बाविस्कर, अविनाश देवरे यांच्यासह एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक आनंदसिंग पाटील, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, विजय पाटील, गणेश शिरसाडे, सचिन मुंडे, रामकृष्ण पाटील, अल्ताफ पठाण, इमरान सय्यद, सुधीर साळवे, किशोर पाटील, योगेश बारी, सचिन बारी, विकास सातदिवे, मुदस्सर काझी, मुकेश पाटील, छगन तायडे, किरण पाटील, राहुल रगडे, विशाल कोळी, साईनाथ मुंडे, सतीश गर्जे अशांचे वेगवेगळे तीन पथक करून एकूण 5 गुन्हेगारांना अटक केली. तपास पोलीस उपनिरीक्षक आनंदसिंग पाटील करीत आहे.

हेही वाचा : 

The post जळगाव : दुकानातील कामगारच निघाला मास्टरमाईंड, व्यापाऱ्याची 8 लाखांची रोकड लांबविली appeared first on पुढारी.

Exit mobile version