Site icon

जळगाव : शेत जमिनीसाठी भावाच्या हत्येचा प्रयत्न, तिघांना जन्मठेप

जळगाव : वडीलोपार्जीत शेतजमिन नावावर करुन देण्यासाठी सख्ख्या भावासह त्याचा शालक व दोन मित्रांनी भावावर प्राणघातक हल्ला करुन त्याचा खूनाचा प्रयत्न केला होता. ही घटना पाचोरा तालुक्यात घडली होती. याप्रकरणात १४ जणांची साक्ष महत्वपुर्ण ठरली असून, न्यायालयाने तिन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

पाचोरा तालुक्यातील लोहारा दूरक्षेत्र अंतर्गत पिंपळगाव हरे. पोलीस ठाण्यात १ जून २०१३ रोजी दाखल असलेल्या फिर्यादीनुसार दिलीप दत्तू डांबरे यांनी वडीलांच्या मृत्यूपुर्वी त्यांच्याकडून ४ एकर शेती पैकी ३ एकर शेती विकत घेतली होती. तर उर्वरीत १ एकर शेत त्यांचा भाऊ संजय दत्तू डांबरे यांच्या नावावर करुन द्यावे. यासाठी भाऊ संजय डांबरे यांनी त्यांचे शालक बापू मधुकर बागुल, उमेश मधुकर बागुल व मित्र विजय सुरसिंग राजपूत रा. मोहाडी यांनी संगनमत करुन दिलीप डांबरे यांच्यावर जीवेठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला होता.

पुणे : स्टेअरिंग फेल झाल्याने एसटी दगडाला धडकली ; 70 ते 75 प्रवासी बालंबाल बचावले

१४ जणांची साक्ष महत्वत्पुर्ण ठरली…

हा खटला जिल्हा न्यायाधीश व अति. सत्र न्यायाधीश डी. एन. खडसे यांच्या न्यायालयात चालला. या खटल्यात १४ साक्षीदारांची साक्ष महत्वत्पुर्ण ठरली. न्यायालयाने संजय दत्तू डांबरे, उमेश मधुकर बागुल व विजय सुरसिंग राजपुत रा. मोहाडी या तिघांना दोषी ठरवित जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सरकारपक्षातर्फे सहा. सरकारी वकील अँड निलेश चौधरी यांनी तर पैरवी अधिकारी म्हणून देविदास कोळी, विजय पाटील यांनी सहकार्य केले.

हेही वाचा : 

The post जळगाव : शेत जमिनीसाठी भावाच्या हत्येचा प्रयत्न, तिघांना जन्मठेप appeared first on पुढारी.

Exit mobile version