Site icon

त्र्यंबकेश्वरमध्ये तीन दिवस खासगी वाहनांना ‘नो एन्ट्री’

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

येथे श्रावण सोमवारी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता 2 ते 4 सप्टेंबर या कालावधीत शहरात खासगी वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत असल्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

येथे तिसऱ्या श्रावणी सोमवारी भाविक खासगी वाहनाने येत असतात. त्यामुळे येथे वाहनतळासाठी जागा अपुरी पडते. अशा वेळी या मार्गावर वाहतूक सुरू राहिल्यास एखाद्या भाविकास वाहनाचा धक्का लागून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचा अहवाल जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी सादर केला आहे. त्याप्रमाणे अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी शासन अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार त्र्यंबकेश्वर येथे जाणाऱ्या काळ्या-पिवळ्या टॅक्सी, रिक्षा, चारचाकी, दुचाकी वाहने तसेच इतर सर्व खासगी वाहने इत्यादी वाहनांना दि. 2 ते 4 सप्टेंबर या काळात त्र्यंबकेश्वर गावात जाण्यास प्रवेशबंदी असेल.

येथे नाशिकमार्गे जाणाऱ्यांना खंबाळे येथे, जव्हारमार्गे जाणाऱ्यांना अंबोली व घोटीमार्गे जाणाऱ्यांना पहिणे येथे वाहनतळ व्यवस्था असेल. सर्व भाडोत्री, काळ्या-पिवळ्या टॅक्सी, रिक्षा, चारचाकी, दुचाकी वाहने इत्यादी वाहनांना तेथे थांबावे लागेल. त्यानंतर तिथून पुढे एसटी बसेस उपलब्ध असतील.

हेही वाचा :

The post त्र्यंबकेश्वरमध्ये तीन दिवस खासगी वाहनांना 'नो एन्ट्री' appeared first on पुढारी.

Exit mobile version