Site icon

‘धन्यवाद मोदीजी’ अभियानास नाशिकमध्ये सिडकोतून सुरुवात

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
केंद्र सरकारच्या माध्यमातून देशभरातील सामान्य जनतेला विविध योजनांचा लाभ झालेला आहे. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून धन्यवाद व्यक्त करण्याच्या अभियानाला मंगळवारी सिडकोतून आ. सीमा हिरे यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली.

कामटवाडे परिसरातील संपर्क कार्यालयात या अभियानाच्या प्रारंभाप्रसंगी भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अमित घुगे, माजी नगरसेविका प्रतिभा पवार, युवा मोर्चा सिडको मंडल अध्यक्ष डॉ. वैभव महाले, शहर उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, अशोक पवार, प्रकाश चकोर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. मोफत लसीकरण, स्वस्त धान्य व स्वनिधी, गरीब कल्याण, स्किल इंडिया, पीकविमा योजना, स्वस्त भारत, बेटी बचाव बेटी पढाव, उज्ज्वला, आयुष्मान भारत अशा विविध योजना राबविल्या जात आहेत. त्याबद्दल पंतप्रधान यांना पत्र पाठविले जात आहे.

हेही वाचा :

The post ‘धन्यवाद मोदीजी' अभियानास नाशिकमध्ये सिडकोतून सुरुवात appeared first on पुढारी.

Exit mobile version