Site icon

धुळे जिल्ह्यातील पोलीस प्रशासन लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न करणार – पोलीस अधीक्षक बारकुंड

धुळे : पुढारी वृत्तसेवा

धुळे जिल्ह्यामध्ये कायद्याचे राज्य राखण्याचे काम केले जाईल. पोलीस प्रशासन लोकाभिमुख ठेवण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे प्रतिपादन नवनियुक्त पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी केले.

धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे आज मावळते पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांच्याकडून नवनियुक्त पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी स्वीकारली. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक पाटील त्यांना निरोप दिला. यानंतर नवनियुक्त पोलीस अधीक्षक बारकुंड यांनी पोलीस अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन जिल्ह्याच्या कामकाजाचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांची संवाद साधताना त्यांनी धुळ्यात कायद्याचे राज्य राहील असे आश्वासित केले. धुळे जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांची दूरध्वनी सुरू केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे नादुरुस्त असणारी संपर्क यंत्रणादेखील दुरुस्तीचा प्रयत्न करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. शहरातील वाहतूक समस्या सुरळीत करण्याकडे लक्ष राहणार असून खुनाची उकल आणि अन्य गंभीर गुन्ह्यांचे आढावा घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा:

The post धुळे जिल्ह्यातील पोलीस प्रशासन लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न करणार - पोलीस अधीक्षक बारकुंड appeared first on पुढारी.

Exit mobile version